मुंबई, 2 मे : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) यांच्यात आज (सोमवार) आयपीएल स्पर्धेतील लढत होत आहे. राजस्थानची टीम 12 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर केकेआरची टीम 6 पॉईंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे. केकेआरची टीम सलग 5 मध्ये पराभूत झाली असून त्यांचा प्रयत्न ही मालिका तोडण्याचा असेल. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) आत्तापर्यंत 36.25 च्या सरासरीनं 290 रन केले आहेत. पण, त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळालेली नाही. व्यंकटेश अय्यर आणि वरूण चक्रवर्ती या केकेआरनं रिटेन केलेल्या खेळाडूनं यंदा निराशा केली आहे. वरूणला तर खराब कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध वगळण्यात आले होते. केकेआरसमोर या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या जोस बटलरला लवकर आऊट करण्याचं आव्हान असेल. या दोन टीममध्ये यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये बटलरनं शतक झळकावलं होतं. राजस्थानची टीम बटलरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यानं या सिझनमध्ये 3 शतकांसह 566 रन केले आहेत. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनलाही त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे. KKR vs RR Dream 11 Team Prediction कप्तान: जोस बटलर व्हाईस कॅप्टन: युजवेंद्र चहल विकेट किपर: संजू सॅमसन बल्लेबाज: देवदत्त पडिक्कल, श्रेयस अय्यर, नितीश राणा, संजू सैमसन ऑल राऊंडर: आर अश्विन, सुनील नरीन, आंद्रे रसेल बॉलर: टीम साऊदी, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा IPL 2022 Points Table : नव्या टीम टॉपवर, चेन्नईच्या विजयानं SRH चं टेन्शन वाढलं कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅकसन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्स, अनुकूल रॉय, रसीक सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंग, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, आरोन फिंच, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चामिका करुणारत्ने राजस्थान रॉयल्स : देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, शुभम गरव्हाल, रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम, डॅरेल मिचेल, करुण नायर, ओबेड मॅककॉय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.