मुंबई, 2 मे : लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) विजय मिळवताच आयपीएल 2022 मधील पॉईंट टेबलमध्ये बदल झाला आहे. केएल राहुलची (KL Rahul) लखनऊ टीम तिसऱ्यावरून दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. लखनऊनं आत्तापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. या आयपीएल सिझनमध्ये पदार्पण करणाऱ्या दोन्ही टीम सध्या पहिल्या दोन क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लखनऊच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबादनं सलग पाच विजयासह दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली होती. त्यानंतर त्यांची घसरण झाली आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनंही त्यांचा 13 रननं पराभव केला. हैदराबादनं 9 पैकी 4 सामने गमावले असून 5 मध्ये विजय मिळवला आहे. चेन्नईपूर्वी गुजरात टायटन्सनं त्यांचा पराभव केला होता. हैदराबादची टीम अजूनही टॉप 4 मध्ये असली तरी ही जागा कायम ठेवण्यासाठी त्यांना पुढील 5 मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) पाचव्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ विरूद्ध पराभूत होऊनही दिल्ली कॅपिटल्स (DC) सहाव्या क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर पंजाब किंग्जचा (Punjba Kings) क्रमांक आहे. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) शनिवारी तिसरा विजय मिळवला. त्यांचे आणि कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) पॉईंट्स सारखे आहेत. पण, केकेआरचा रनरेट सीएसकेपेक्षा चांगला आहे. त्यामुळे केकेआर आठव्या तर सीएके नवव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम 10 व्या क्रमांकावर असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.
IPL 2022: CSK च्या खेळाडूला ‘लेडी लक’चा फायदा, लग्नानंतर पहिल्याच मॅचमध्ये काढला वचपा
आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी दहा टीम खेळत असल्या तरी यामधील टॉप 4 टीमच ‘प्ले ऑफ’ साठी पात्र होणार आहेत. ‘प्ले ऑफ’ साठी पहिल्या दोन क्रमांकानं पात्र होणाऱ्या टीमन्सा फायनलमध्ये जाण्याची एक अतिरिक्त संधी असते. त्यामुळे तिथं जाण्याचाही प्रत्येक टीमचा प्रयत्न असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.