Home /News /sport /

IPL 2022, KKR vs DC Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IPL 2022, KKR vs DC Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 'नो बॉल' चा वाद विसरून कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध (Kolkata Knight Riders) नव्या जोमानं मैदानात उतरावं लागेल.

    मुंबई, 28 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 'नो बॉल' चा वाद विसरून कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध (Kolkata Knight Riders) नव्या जोमानं मैदानात उतरावं लागेल. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 15 रननं पराभव झाला होताय त्या मॅचमधील शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल न देण्याचा अंपायरचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या निर्णयाला दिल्ली कॅपिटल्लनं विरोध केला. त्यामुळे कॅप्टन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) मॅच फिसमधील सर्व रक्कम कापून घेण्यात आली आहे. तर सहाय्यक कोच प्रविण आम्रे यांना एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय. दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टिंगनं तो सामना क्वारंटाईनमधील खोलीतून बघितला होता. आता पॉन्टिंग क्वारंटाईनची मुदत संपूवन टीमला कोचिंग करण्यासाठी सज्ज आहे. तसंच . मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि टीम सायफर्ट (Tim Seifert) हे दिल्लीचे खेळाडू आता कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. मार्श आणि सायफर्ट आता फिट असून त्यांनी टीमसोबत प्रॅक्टीस सेशनमध्ये भाग घेतला. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममध्येही सातत्याचा अभाव दिसून येतोय. या टीमा 8 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले असून ते सध्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत. 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याचा मार्ग आणखी खडतर होण्यापूर्वी कोलकाताला ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. या दोन्ही टीममध्ये यापूर्वी झालेली मॅच दिल्ली कॅपिटल्सनं जिंकली होती. त्याचा बदला घेण्याचीही कोलकाताला संधी आहे. IPL 2022 : KKR च्या मॅचपूर्वी दिल्लीसाठी गुड न्यूज! पंतचं मोठं टेन्शन खल्लास DC vs KKR Dream 11 Team Predication कॅप्टन: डेव्हिड वॉर्नर व्हाईस कॅप्टन: श्रेयस अय्यर विकेट किपर: ऋषभ पंत बॅटर्स: पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत ऑल राऊंडर्स: आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, सुनील नरेन बॉलर: उमेश यादव, कुलदीप यादव, टिम साउदी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, KKR

    पुढील बातम्या