जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : KKR च्या मॅचपूर्वी दिल्लीसाठी गुड न्यूज! पंतचं मोठं टेन्शन खल्लास

IPL 2022 : KKR च्या मॅचपूर्वी दिल्लीसाठी गुड न्यूज! पंतचं मोठं टेन्शन खल्लास

IPL 2022 : KKR च्या मॅचपूर्वी दिल्लीसाठी गुड न्यूज! पंतचं मोठं टेन्शन खल्लास

आयपीएलमध्ये आज (गुरूवार) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात लढत होत आहे. या मॅचपूर्वी दिल्लीसाठी एक गुड न्यूज आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 एप्रिल : आयपीएल स्पर्धेचा (IPL 2022) उत्तरार्ध आता सुरू झाला आहे. या टप्प्यात ‘प्ले ऑफ’ ची शर्यत आणखी तीव्र होणार आहे. ‘प्ले ऑफ’ मधील 4 जागांसाठी 8 टीममध्ये सध्या जोरदार चुरस आहे. या सर्वांसाठी आता प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. आयपीएलमध्ये आज (गुरूवार) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात लढत होत आहे. केकेआरची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या तर दिल्लीची टीम सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. केकेआर विरूद्धच्या महत्त्वाच्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक गुड न्यूज आहे. मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि टीम सायफर्ट (Tim Seifert) हे दिल्लीचे खेळाडू आता कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. मार्श आणि सायफर्ट आता फिट असून त्यांनी टीमसोबत प्रॅक्टीस सेशनमध्ये भाग घेतल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सनं ट्विट करत दिली आहे.

जाहिरात

मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर मागील आठवड्यात पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या मॅचच्या काही तास आधी सायफर्टला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. आता हे दोघेही फिट असून त्यांनी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या केकेआर विरूद्धच्या मॅचसाठी सरावही केला. IPL 2022, VIDEO: 153kph च्या वेगानं उमराननं टाकला यॉर्कर, डेल स्टेनही झाला थक्क! दिल्ली कॅपिटल्सची या सिझनमधील वाटचाल अडखळती राहिली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव करत स्पर्धेची सुरूवात जोरदार केली होती. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध दिल्लीचा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सचा 44 रननं पराभव करत दिल्लीनं स्पर्धेत कमबॅक केलं. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं त्यांचा 16 रननं पराभव केला. कोरोनाचा फटका बसूनही दिल्लीनं पंजाब किंग्जचा 9 विकेट्सनं एकतर्फी पराभव केला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं पराभव केल्यानं दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात