जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : विलियमसनच्या खेळावर लारा नाराज, आऊट झाल्यानंतरची प्रतिक्रिया VIRAL

IPL 2022 : विलियमसनच्या खेळावर लारा नाराज, आऊट झाल्यानंतरची प्रतिक्रिया VIRAL

BCCI Photo

BCCI Photo

हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसन (Kane Williamson) ज्या पद्धतीनं आऊट झाला ते पाहून या टीमचा बॅटींग कोच आणि महान क्रिकेटपटू ब्रायन लाराला (Brian Lara) निराशा लपवता आली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसन (Kane Williamson) साठी हा आयपीएल सिझन निराशाजनक ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्सला जिंकण्यासाठी 178 रनची आवश्यकता होती. त्यावेळी ओपनिंगला आलेला विलियमसन 17 बॉलमध्ये फक्त 9 रन काढून आऊट झाला. हैदराबादचा कॅप्टन ज्या पद्धतीनं आऊट झाला ते पाहून या टीमचा बॅटींग कोच आणि महान क्रिकेटपटू ब्रायन लाराला (Brian Lara) निराशा लपवता आली नाही. विलियमसननं पॉवर प्लेमध्ये संथ सुरूवात केली. पाच ओव्हर संथ खेळून काढल्यानंतर त्यानं सहाव्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलच्या बॉलिंगवर वेगानं रन काढण्याचं ठरवलं होतं. पण, त्याचा हा प्रयत्न फसला. रसेलनं त्याला दुसऱ्याच बॉलवर आऊट केलं. विलियमसन आऊट झाल्यानंतर ब्रायन लाराची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.लारानं त्याचं तोंड लपवत निराशा व्यक्त केली. केन विलियमसनला सनरायझर्स हैदराबादनं 14 कोटींमध्ये रिटेन केले होते. त्याने टीम मॅनेजमेंटची साफ निराशा केली. विलियमसननं या सिझनमधील 12 सामन्यात 18.90 च्या सरासरीनं 208 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 92.85 आहे. ओपनिंगला येणारा विलियमसन संथ खेळून आऊट होत असल्याचा परिणाम टीमच्या कामगिरीवर झाला आहे.

जाहिरात

कोलकाता नाईट रायडर्सनं या सामन्यात आंद्र रसेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सनरायझर्सचा 54 रननं मोठा पराभव केला. हैदराबादचा हा सलग पाचवा पराभव आहे. केकेआरचा 13 सामन्यांमधला हा सहावा विजय आहे. केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 177 रन केले. सनरायझर्सला 178 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 123 रन करता आले. सायमंड्सच्या अकाली मृत्यनं हरभजन गहिवरला, मैदानात होते सर्वात मोठे शत्रूत्व! केकेआर विरूद्धचा सामना गमावल्यानंतर हैदराबादची प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांचा हा 12 सामन्यातील 7 वा पराभव असून पॉईंट टेबलमध्ये ही टीम आठव्या क्रमांकावर घसरली आहे. आता हैदराबादनं उर्वरित 2 सामने जिंकले तरी त्यांचा इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022 , KKR , SRH
  • First Published :
जाहिरात
जाहिरात