काय होते मंकी गेट प्रकरण? 2007-08 मध्ये भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती त्यावेळी सायमंड्स आणि हरभजन यांच्यात जोरदार वाद झाला होता. 'मंकीगेट' म्हणून ते प्रकरण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. भारताच्या दौऱ्यातील दुसरी टेस्ट सिडनीमध्ये झाली होती. या टेस्टच्या दरम्यान सायमंड्स आणि हरभजन यांच्यात वाद झाला होता. हरभजननं वांशिक शेरेबाजी केल्याची तक्रार सायमंड्सनं सामनाअधिकाऱ्याकडं केली होती. हरभजननं सायमंड्सला माकड (मंकी) म्हणून चिडवल्याचा दावा ऑस्ट्रेलियन टीमचा तेव्हाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं केला होता. Andrew Symonds Died: 3 महिन्यात 3 क्रिकेटपटूंचे निधन, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान या प्रकरणात हरभजनवर काही सामन्यांची बंदी घालण्यात आली. त्यावेळी टीम इंडियानं हरभजनची बाजू घेतली. दोन्ही देशांमधील दौरा रद्द होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टीम इंडियानं या प्रकरणात अपिल केले. त्यानंतर हरभजनवरील बंदी उठवण्यात आली आणि त्याच्या मॅच फिसमध्ये कपात करण्यात आली.Shocked to hear about the sudden demise of Andrew Symonds. Gone too soon. Heartfelt condolences to the family and friends. Prayers for the departed soul 🙏#RIPSymonds
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 15, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, Harbhajan singh