Home /News /sport /

IPL 2022 : ऋषभ पंतनं दाखवलं धोनीसारखं स्किल, श्रेयस अय्यरलाही धक्का! पाहा VIDEO

IPL 2022 : ऋषभ पंतनं दाखवलं धोनीसारखं स्किल, श्रेयस अय्यरलाही धक्का! पाहा VIDEO

दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल स्पर्धेतील 41 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (DC vs KKR) 4 विकेट्सनं पराभव केला. लदीपची बॉलिंग आणि ऋषभ पंतची (Rishbah Pant) चपळता यामुळे केकेआरला मोठा स्कोअर करता आला नाही.

    मुंबई, 29 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल स्पर्धेतील 41 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (DC vs KKR) 4 विकेट्सनं पराभव केला. या लढतीमध्ये कुलदीप यादव आणि मुस्तफिजूर रहमान यांच्या अचूक बॉलिंगमुळे केकेआरला मोठा स्कोर करता आला नाही. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सुरूवातीच्या पडझडीनंतर केकेआरची इनिंग सावरली होती. श्रेयसनं नितिश राणासोबत पाचव्या विकेट्ससाठी 48 रनची भागिदारी केली. त्यानंतर कुलदीपची बॉलिंग आणि  ऋषभ पंतची (Rishbah Pant) चपळता यामुळे केकेआरला मोठा स्कोअर करता आला नाही. केकेआरच्या इनिंगमधील 14 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरचा पहिलाच बॉल कुलदीपनं ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. तो बॉल बराच खाली राहिला. त्यामुळे श्रेयसला मोठा फटका मारता आला नाही, श्रेयसच्या बॅटला लागून अगदी खाली राहिलेल्या त्या बॉलवर पंतनं तितकंच खाली वाकत अफलातून कॅच पकडला. कुलदीपनं त्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर धोकादायक आंद्रे रसेलला आऊट केलं. कुलदीपच्या बॉलवर पुढे येऊन सिक्स लगावण्याचा रसेला प्रयत्न फसला. पंतनं कोणतीही चूक न करता रसेलचं स्टंपिग करत केकेआरला मोठा धक्का दिला. रसेल शून्यावरच आऊट झाला. केकेआरला अखेर निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 146 रन करता आले. श्रेयस अय्यरनं 42 तर नितिश राणानं 57 रनची खेळी केली. दिल्लीकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 3 ओव्हर्समध्ये 14 रन देत 4 विकेट्स घेतल्या. मुस्तफिजूर रहमाननं 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. तर चेतन सकारिया आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. IPL 2022 : पहिल्या बॉलवर पृथ्वीला खिंडार! उमेश यादवनं हे काय केलं... VIDEO केकेआरनं 147 रनचं लक्ष्य 4 विकेट्स आणि 1 ओव्हर राखत पूर्ण केले. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 42 रन केले. तर रोव्हमन पॉवेलनं 16 बॉलमध्ये नाबाद 33 रन काढले. केकेआरकडून उमेश यादवनं 3, तर सुनील नरीन आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, KKR, Rishabh pant, Shreyas iyer

    पुढील बातम्या