जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, VIDEO: 153kph च्या वेगानं उमराननं टाकला यॉर्कर, डेल स्टेनही झाला थक्क!

IPL 2022, VIDEO: 153kph च्या वेगानं उमराननं टाकला यॉर्कर, डेल स्टेनही झाला थक्क!

IPL 2022, VIDEO: 153kph च्या वेगानं उमराननं टाकला यॉर्कर, डेल स्टेनही झाला थक्क!

सनरायझर्स हैदराबादनचा गुजरात टायटन्स विरूद्ध (SRH vs GT) झालेल्या मॅचमध्ये 5 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवातही हैदराबादचा फास्ट बॉलर उमरान मलिकनं (Umran Malik) सर्वांना प्रभावित केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 एप्रिल : सनरायझर्स हैदराबादनचा गुजरात टायटन्स विरूद्ध (SRH vs GT) झालेल्या मॅचमध्ये 5 विकेट्सनं पराभव झाला. या मॅचमध्ये अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादच्या हातातून विजय निसटला. या पराभवातही हैदराबादचा फास्ट बॉलर उमरान मलिकनं (Umran Malik)  सर्वांना प्रभावित केलं. 22 वर्षांच्या उमराननं आयपीएल कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 25 रन देत 5 विकेट्स घेतल्या. गुजरात विरूद्धच्या मॅचमध्ये हैदराबादकडून सर्व 5 विकेट्स उमरानलाच मिळाल्या. उमराननं या स्पेलमध्ये गुजरातचा ओपनर वृद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) देखील आऊट केले. साहानं या मॅचमध्ये 38 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 68 रन काढले. मैदानात संपूर्णपणे सेट झालेल्या साहाला उमराननं त्याच्या वेगवान यॉर्करनं चुकवलं. 153 kph च्या स्पीडनं उमराननं टाकलेल्या बॉलवर साहाला काहीही करता आलं नाही. साहाची थेट दांडी उडाली. उमरानचा हा भन्नाट यॉर्कर पाहून साहासह सनरायझर्स हैदराबादचा फास्ट बॉलिंग कोच डेल स्टेन देखील आश्चर्यचकित झाला.

जाहिरात

उमराननं या मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्यापैकी 4 जणांना त्यानं बोल्ड केलं. साहाला 152.8 किमी, डेव्हिड मिलरला 148.7 किमी, अभिनव मनोहरला 146.8 किमी तर शुभमन गिलला त्यानं 144.2 किमी प्रती तास (kph) गतीनं बोल्ड केलं. तर गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्याला 141.1 किमी प्रती तास गतीनं मार्को जेनसनच्या हाती कॅच आऊट केलं. उमरानची आयपीएलमधील सुरूवात साधारण झाली. पण, त्यानंतर त्यानं गती पकडली आहे. मागील चार मॅचमध्ये त्यानं 12 विकेट्स घेतल्या आहेत. या सिझनमध्ये त्यानं आत्तापर्यंत 15 विकेट्स घेतल्या असून सर्वाधिक विकेट्स मिळवण्यासाठी असलेल्या पर्पल कॅपसाठी दावेदारी सादर केलीय. IPL 2022 : राशिद खाननं केली धोनीची बरोबरी, सनसनाटी विजयानंतर केले जोरदार सेलिब्रेशन! VIDEO उमरानच्या बॉलिंगला अन्य हैदराबादच्या बॉलर्सकडून साथ मिळाली नाही. हैदराबादच्या अन्य बॉलर्सना एकही विकेट मिळाली नाही.हैदराबादविरुद्धच्या या विजयासह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या मोसमात गुजरातने 8 पैकी 7 मॅच जिंकल्या असून फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर हैदराबादची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात