जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी KKR संकटात, दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी KKR संकटात, दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी KKR संकटात, दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर

केकेआरसाठी शनिवारी सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) विरूद्धचा सामना ‘करो वा मरो’ स्वरूपाचा आहे. या सामन्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मे : कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) या आयपीएल सिझनमधील वाटचाल अडखळत झाली आहे. केकेआरनं आत्तापर्यंत 12 सामन्यांत 5 सामने जिंकले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम सातव्या क्रमांकावर आहे. कोलतातानं यापूर्वीच्या सामन्यांत मुंबई इंडियन्स विरूद्ध मोठा विजय मिळवून ‘प्ले ऑफ’ साठी आव्हान कायम ठेवलं आहे. आता केकेआरची पुढील लढत शनिवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरूद्ध होणार आहे. केकेआरसाठी शनिवारचा सामना ‘करो वा मरो’ स्वरूपाचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कमिन्सनं मुंबई इंडियन्स विरूद्ध 3 विकेट्स घेत दमदार कामगिरी केली होती. त्याची अनुपस्थिती हा केकेआरसाठी मोठा धक्का आहे. ‘क्रिकेट.कॉम.एयू’ च्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन मायदेशी परतणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका विरूद्धच्या सीरिजपूर्वी फिट होण्यासाठी कमिन्स सिडनीला रवाना होणार असल्याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. तो बरा होण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कमिन्स टेस्ट टीमच्या कॅप्टन तर आहेच त्याशिवाय वन-डे आणि टी20 टीमचाही प्रमुख सदस्य आहे. IPL 2022 : ‘आम्ही नाराज आहोत…’ वानखेडे स्टेडिअममधील घोळावर CSK ची मोठी प्रतिक्रिया केकेआरकडून कमिन्स पुढील मॅच खेळणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यानं या सिझनध्ये 5 सामने खेळले. त्यामध्ये 7 विकेट्स घेतल्या तसंच 63 रन केले. यामध्ये मुंबई इंडियन्स विरूद्धच्या 14 बॉलमध्ये 56 रनच्या खेळीचा समावेश आहे. कमिन्सला 7 कोटी 25 लाखांमध्ये केकेआरनं खरेदी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket , ipl 2022 , KKR
  • First Published :
जाहिरात
जाहिरात