Home /News /sport /

IPL 2022 : 'आम्ही नाराज आहोत...' वानखेडे स्टेडिअममधील घोळावर CSK ची मोठी प्रतिक्रिया

IPL 2022 : 'आम्ही नाराज आहोत...' वानखेडे स्टेडिअममधील घोळावर CSK ची मोठी प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये (CSK vs MI) DRS नसल्याचा फटका बसला. या प्रकारावर सीएसकेनं नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई, 13 मे : चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये (CSK vs MI) DRS नसल्याचा फटका बसला. सीएसकेच्या इनिंगमधील पहिल्या दोन ओव्हरमध्ये डीआरएसची सोय उपलब्ध नव्हतीा. त्यामुळे सीएसकेला संधी असूनही मैदानातील अंपायरच्या विरोधात थर्ड अंपायरकडं दाद मागता आली नाही. हा सर्व दुर्दैवी प्रकार होता, अशी प्रतिक्रिया सीएसकेचे कोच स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी दिली आहे. काय घडला प्रकार? वानखेडे स्टेडिअमवर गुरूवारी झालेल्या मॅचच्या सुरूवातीला लाईट गेले होते. रोहित शर्मा आणि एमएस धोनी टॉससाठी मैदानात आले तेव्हाच वानखेडे स्टेडियमवरचे लाईट गेले, त्यामुळे टॉसही उशिरा झाला.फक्त टॉसवेळीच नाही तर मॅच सुरू झाल्यानंतरही वीजेच्या समस्येचा फटका बसला. लाईट नसल्यामुळे सुरूवातीला डीआरएसचा (DRS) वापरही करता आला नाही. टॉस जिंकून पहिले बॉलिंग करणाऱ्या मुंबईने पहिल्या 2 ओव्हरमध्येच सीएसकेला 3 धक्के दिले. डॅनियल सॅम्सने पहिल्या ओव्हरमध्ये डेवॉन कॉनवे आणि मोईन अलीला तर बुमराहने दुसऱ्या ओव्हरमध्ये रॉबिन उथप्पाला आऊट केलं. डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यांना अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं, या दोघांनाही डीआरएस घ्यायचा होता, पण लाईट नसल्यामुळे त्यांना ही सुविधा वापरता आली नाही. रिप्लेमध्ये डेवॉन कॉनवेला टाकलेला बॉल लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचं दिसत होतं, पण मैदानातल्या अंपायरने आऊट दिल्यामुळे कॉनवेला पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला निर्णायक टप्प्यात धक्का, मॅच विनर टीममधून आऊट काय म्हणाला फ्लेमिंग? सीएसकेचा हेड कोच स्टिफन फ्लेमिंगनं मॅचनंतर याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. 'त्यावेळी घडलेला प्रकार दुर्दैवी होता. आम्ही या प्रकरामुळे थोडे नाराज आहोत, पण हा सर्व खेळाचा भाग आहे. त्यावेळी मैदानात घडलेल्या काही गोष्टी आमच्या बाजूनं गेल्या नाहीत. आम्ही त्या परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करायला हवी होती.  ती चांगली सुरूवात नव्हती,' या शब्दात फ्लेमिंगनं नाराजी व्यक्त केली आहे. 'अनेक टीमप्रमाणे आम्हीही अद्याप खेळाडूंचा अंदाज घेत आहोत. या अनुभवातून पुढील सिझनमध्ये चांगली कामगिरी करू अशी आशा आहे. चांगला सिझन आणि खराब सिझन यामध्ये फार फरक नसतो. हा आमच्यासाठी खडतर सिझन होता. काही गोष्टींमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे,' असे फ्लेमिंगने सांगितले. मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians

    पुढील बातम्या