मुंबई, 10 मे : दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं पाच वेळेसची विजेता मुंबई इंडियन्सचा (KKR vs MI) 52 रननं पराभव केला. या विजयासह केकेआरनं ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे. आयपीएलच्या 56 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) भेदक बॉलिंग केली. त्यानं या सिझनमधील सर्वात बेस्ट स्पेल टाकला. ‘यॉर्कर’ स्पेशालिस्ट बुमराहनं पहिल्या 3 ओव्हरमध्येच 5 विकेट्स घेतल्या. त्यामध्ये एक ओव्हर मेडन होती. बुमराहनं त्याच्या टी20 कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 10 रन देत 5 विकेट्स घेतल्या. बुमराहच्या या स्पेलमुळे केकेआरची टीम 2 आऊट 123 वरून 9 आऊट 165 रनच करू शकली. बुमराहची बॉलिंग पाहून डीवाय पाटील स्टेडिअमवर उपस्थित असलेली त्याची पत्नी संजना गणेशन चांगलीच आनंदी झाली होती. संजना गणेशननं तिचा आनंद सोशल मीडियावर साजरा केला. तिनं ट्विटरवर आगीच्या तीन इमोजीचा वापर करत ‘माझा नवरा फायर आहे,’ असं ट्विटर केलं. संजनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. . 18 व्या ओव्हरमध्ये बुमराहने एकही रन न देता 3 विकेट घेतल्या, याशिवाय 20 व्या ओव्हरमध्ये त्याने पहिल्या 5 बॉलला एकही रन दिली नाही, पण शेवटच्या बॉलला केकेआरने एक रन काढली.
Holy moly! My husband is 🔥🔥🔥
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) May 9, 2022
केकेआरने दिलेल्या 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची टीम 17.3 ओव्हरमध्ये 113 रनवर ऑल आऊट झाला. पॅट कमिन्सच्या 14 व्या ओव्हरमध्ये मुंबईने अर्धशतक झालेला इशान किशन (Ishan Kishan), डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन या 3 विकेट गमावल्या. या सामन्यात मुंबईचे तब्बल 3 रन आऊट झाले. IPL 2022 : KKR च्या खेळाडूची मुंबईविरुद्ध पुन्हा लागली लॉटरी! लागोपाठ 2 अर्धशतकांनंतर आता… मुंबईविरुद्धच्या या विजयामुळे केकेआरचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान अजूनही कायम आहे. नवव्या क्रमांकावर असलेली केकेआर या विजयासह थेट सातव्या क्रमांकावर गेली आहे. केकेआरने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स शेवटच्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 11 पैकी 9 मॅच हरल्या आहेत तर फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे.

)







