जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : KKR च्या खेळाडूची मुंबईविरुद्ध पुन्हा लागली लॉटरी! लागोपाठ 2 अर्धशतकांनंतर आता...

IPL 2022 : KKR च्या खेळाडूची मुंबईविरुद्ध पुन्हा लागली लॉटरी! लागोपाठ 2 अर्धशतकांनंतर आता...

IPL 2022 : KKR च्या खेळाडूची मुंबईविरुद्ध पुन्हा लागली लॉटरी! लागोपाठ 2 अर्धशतकांनंतर आता...

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी खराब झाली. पहिल्या 8 मॅच गमावल्यामुळे मुंबई आधीच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली. बॉलरना विकेट घेण्यात येत असलेलं अपयश मुंबईच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. आयपीएलच्या या मोसमात मुंबईविरुद्ध इतर टीमच्या खेळाडूंनी 3 शतकं केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी खराब झाली. पहिल्या 8 मॅच गमावल्यामुळे मुंबई आधीच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली, यानंतर रोहितच्या टीमने राजस्थान आणि गुजरातविरुद्ध लागोपाठ 2 विजय मिळवले, पण तोपर्यंत बरीच वेळ निघून गेली होती. बॉलरना विकेट घेण्यात येत असलेलं अपयश मुंबईच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. आयपीएलच्या या मोसमात मुंबईविरुद्ध इतर टीमच्या खेळाडूंनी 3 शतकं केली. यात लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने 2 तर राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने (Jos Buttler) एक शतक केलं. याशिवाय बऱ्याच खेळाडूंनी मुंबईच्या बॉलिंगवर जोरदार आक्रमण केलं. केकेआरचा ओपनर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा यापैकीच एक. आयपीएल 2022 मध्ये व्यंकटेश अय्यरची कामगिरी निराशाजनक झाली. व्यंकटेश अय्यरने मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (MI vs KKR) 41 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले होते, यानंतर सोमवारच्या सामन्यात अय्यर 24 बॉलमध्ये 43 रन करून आऊट झाला. याउलट या मोसमात इतर टीमविरुद्ध अय्यरने 8 इनिंगमध्ये 10.25 च्या सरासरीने 82 रन केले. व्यंकटेश अय्यरने या हंगामात 10 मॅचमध्ये 19.44 च्या सरासरीने आणि 110.06 च्या स्ट्राईक रेटने 175 रन केल्या, यातल्या 93 रन म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त रन मुंबईविरुद्धच आल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमातही अय्यरने मुंबईविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. मुंबईविरुद्ध लागोपाठ 2 अर्धशतकं केल्यानंतर आता तो अखेर या सामन्यात 43 रन करून आऊट झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या ओपनरनी केकेआरला 5.4 ओव्हरमध्ये 60 रन करून चांगली सुरूवात करून दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात