मुंबई, 31 जानेवारी : भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे. खराब फिटनेस आणि फॉर्मचा हार्दिकला फटका बसला आहे. गेली काही महिने दूर असणाऱ्या हार्दिकची आगामी आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) अहमदाबादच्या टीमनं कॅप्टन म्हणून घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजनंतर होणाऱ्या श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत हार्दिक पुनरागमन करेल, अशी चर्चा आहे. हार्दिकनं स्वत: या विषयावरील मौन सोडलं आहे. हार्दिकनं आपलं सध्या लक्ष हे आयपीएल स्पर्धेवर असल्याचं जाहीर केलं आहे. ‘इकोनॉमिक टाईम्स’ शी बोलताना हार्दिकनं सांगितलं की, ‘टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी फिट होण्यासाठी मी तयारी करत आहे. माझे सर्व प्लॅनिंग आणि ट्रेनिंग हा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. मला देशासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. तो माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असेल. तो माझा ध्यास आहे. आयपीएलमुळे मला वर्ल्ड कपसाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे. पण माझे ध्येय वर्ल्ड कप आहे.’ असे हार्दिकने स्पष्ट केले. हार्दिक पांड्या खराब फिटनेसमुळे बॉलिंग करू शकत नव्हता. त्याचबरोबर तो टी20 वर्ल्ड कपमध्ये बॅटर म्हणूनही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. आता आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये ही कसर भरून काढणे हे त्याचे ध्येय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India - Pakistan) यांचा पुन्हा एकदा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. भारतामध्ये येण्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या ऑल राऊंडरचा धमाका, 4 बॉलमध्ये घेतल्या 4 विकेट्स हार्दिक पांड्या यंदा पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडून अन्य टीमकडून आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. मुंबईनं त्याा यंदा रिटेन केले नाही. त्यानंतर अहमदाबादनं त्याची कॅप्टन म्हणून निवड केली. अहमदाबादच्या टीमनं हार्दिकसह राशिद खान आणि शुभमन गिल यांना आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







