मुंबई, 31 जानेवारी : वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड (West Indies vs England) यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्याचा शेवट जबरदस्त झाला. या मालिकेतील पहिल्या 4 सामन्यानंतर दोन्ही टीम 2-2 ने बरोबरीत होत्या. इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 20 रनची आवश्यकता होती. 6 बॉलमध्ये 20 रन हे टी20 क्रिकेटमधील अशक्य टार्गेट नाही. पण, वेस्ट इंडिजच्या दिग्गज ऑल राऊंडरच्या मनात काही तरी वेगळे होते. 4 बॉलमध्ये काम तमाम वेस्ट इंडिजकडून शेवटची ओव्हर अनुभवी ऑल राऊंडर जेसन होल्डरनं (Jason Holder) टाकली. इंग्लंची सॅम बिलिंग्स आणि ख्रिस जॉर्डन ही जोडी मैदानात होती. या दोघांनाही टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. होल्डरनं ओव्हरची सुरूवात खराब केली. त्यानं पहिला बॉल नो बॉल टाकत इंग्लंडला एक रन गिफ्ट दिला. होल्डरची त्या ओव्हरमधील ती एकमेव चूक होती. त्यानं दुसऱ्या बॉलवर ख्रिस जॉर्डनला आऊट केले. पुढच्या बॉलवर सॅम बिलिंग्सला आऊट करत वेस्ट इंडिजच्या दिशेनं मॅच झुकवलं. त्यानंतर आदिल राशिदला आऊट करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. टी20 इंटरनॅशनलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला वेस्ट इंडिजचा क्रिकेपटू ठरला. होल्डर इतक्यावर थांबला नाही. त्याने ओव्हरच्या पाचव्या बॉलवर साकिब महमूदला आऊट करत इतिहास रचला.
Jason Holder picks up FOUR WICKETS in FOUR BALLS to end the England innings! 🤯#WIvENG pic.twitter.com/SrZDAbG3pr
— ICC (@ICC) January 30, 2022
होल्डरनं 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं या मॅचमध्ये एकूण 5 विकेट्स घेतल्या. होल्डरच्या बॉलिंगच्या जोरावर वेस्ट इंडिजनं पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 17 रननं पराभव करत 3-2 या फरकानं मालिका जिंकली. 4 बॉलमध्ये 4 विकेट्स होल्डर लसिथ मलिंगा कर्टिस कँपर आणि राशिद खान या बॉलर्सच्या यादीमध्ये दाखल झाला आहे. CRPF जवानाचा मुलगा बनला स्विंगचा सुलतान! टीम इंडियाचा मोठा शोध संपणार? टीम इंडियाला इशारा वेस्ट इंडिजची टीम या मालिकेनंतर भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारताविरूद्ध 3 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका वेस्ट इंडिज खेळणार आहे. या मालिकेपूर्वी होल्डरनं ही ऐतिहासिक कामगिरी करत टीम इंडियाला इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावातही होल्डरला मोठी किंमत मिळण्यास त्याच्या या ऑल राऊंड कामगिरीची मदत होणार आहे.

)







