मुंबई, 15 एप्रिल : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2022 हा सिझन बॅटींग आणि बॉलिंगसह कॅप्टनसीनंही गाजवत आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या नव्या टीमचा कॅप्टन असलेल्या हार्दिकनं स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीचा फायदा टीमलाही होत असून गुजरातची टीम 5 मॅचमध्ये 4 विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. गुरूवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअमवर झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 37 रननं पराभव केला. गुजरातच्या या विजयात हार्दिकचा मोलाचा वाटा होता. त्यानं 52 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली. एक विकेट घेतली तसंच निर्णायक क्षणी राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला (Sanju Samson) रन आऊटही केलं. हार्दिक पांड्या बॉलिंग करताना जखमी झाल्यानं टीम इंडियाच्या फॅन्सची काळजी वाढली आहे. हार्दिक त्याची तिसरी ओव्हर टाकत असताना जखमी झाला. त्यामुळे तीन बॉलनंतर तो मैदान सोडून गेला. विजय शंकरनं ती ओव्हर पूर्ण केली. राजस्थानवरील विजयानंतर बोलताना हार्दिकनं या दुखापतीबाबत अपडेट दिलं आहे. ‘घाबरण्याची काहीही गरज नाही. तो फक्त एक क्रँप होता. जास्त गंभीर नाही,’ असं हार्दिकनं सांगितलं. ‘मी गेल्या मॅचमध्ये 15 ओव्हर आणि यंदा 17 ओव्हर्स बॅटींग केली. त्यामुळे असं झालं असावं. मला इतका वेळ बॅटींग करण्याची सवय नाही. कॅप्टनसी करण्यात मजा येते, कारण तुम्ही आघाडीवर राहून टीमचं नेतृत्त्व करता. IPL 2022 : 16 ची सरासरी असणारा ऑल राऊंडर म्हणतो, ‘मी भारताचा बेस्ट फिनिशर…’ आम्ही सर्व एकत्र एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहोत. आमच्या टीममधील वातावरणाचा आम्हाला फायदा मिळतोय. प्रत्येक जण आनंदी राहावा, अशी माझी इच्छा आहे.’ असं हार्दिक म्हणाला. राजस्थान विरूद्ध तिसऱ्याच ओव्हरमध्ये बॅटींगसाठी आलेला हार्दिक गुजरात टायटन्ससाठी संकटमोचक ठरला. त्यानं शेवटपर्यंत बॅटींग करत नाबाद 87 रन केले. त्यानं या खेळीत 8 फोर आणि 4 सिक्स लगावले. या ऑल राऊंड कामगिरीसाठी हार्दिकला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारानंही गौरवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.