Home /News /sport /

IPL 2022 : 16 ची सरासरी असणारा ऑल राऊंडर म्हणतो, 'मी भारताचा बेस्ट फिनिशर...'

IPL 2022 : 16 ची सरासरी असणारा ऑल राऊंडर म्हणतो, 'मी भारताचा बेस्ट फिनिशर...'

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ऑल राऊंडर रियान परागनं फक्त राजस्थानचाच नाही तर टीम इंडियाचाही बेस्ट फिनिशर होण्याची क्षमता असल्याचा दावा केला आहे

    मुंबई, 15 एप्रिल : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ऑल राऊंडर रियान परागनं फक्त राजस्थानचाच नाही तर टीम इंडियाचाही बेस्ट फिनिशर होण्याची क्षमता असल्याचा दावा केला आहे. रियान 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा सदस्य होता. त्यानं 2019 साली राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. यंदाच्या लिलावात राजस्थाननं पुन्हा एकदा त्याला 3 कोटी 80 लाखांंमध्ये खरेदी केले. गेल्या काही वर्षांमध्ये आपण खूप काही शिकल्याचा दावा परागनं केला आहे. 'क्रिकट्रॅकर' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पराग म्हणाला की, 'मला स्वत:ची जास्त प्रशंसा करायची नााही. पण, माझ्या मते मी राजस्थान रॉयल्सच नाही तर आगामी काळात टीम इंडियाचा सर्वश्रेष्ठ फिनिशर होऊ शकतो. माझ्याकडे ते कौशल्य आहे. माझ्यात ऑल राऊंडरची क्षमता आहे. मी बॅटींग, बॉलिंगसह चांगली फिल्डिंगही करू शकतो. मला सातत्यानं खेळून बरंच काही करायला मिळालं आहे. माझ्या आणखी जास्त करण्याची क्षमता आहे. मी राजस्थान रॉयल्स आणि टीम इंडियासाठी बरंच काही करू शकतो, याचा मला विश्वास आहे.' IPL 2022 : हार्दिक पांड्यानं केलं लाखोंचं नुकसान, मॅच थांबवण्याची आली वेळ फक्त 16 सरासरी! रियान परागनं बराच मोठा दावा केला असला तरी आकडेवारी बरीच वेगळी आहे. तो सलग चौथा सिझन राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. त्यानं आत्तापर्यंत 35 आयपीएल मॅचमध्ये 385 रन केले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 15.92 इतकी असून स्ट्राईक रेट 119.75 आहे. ऑल राऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियाननं आत्तापर्यंत फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. रियानकडं कॅप्टनसीचा अनुभव असून त्यानं आसाम टीमची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कॅप्टनसी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या