जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 57 मॅचनंतर 'प्ले ऑफ' ची पहिली टीम ठरली, आता तीन जागांसाठी 8 जणांमध्ये जोरदार चुरस

IPL 2022 : 57 मॅचनंतर 'प्ले ऑफ' ची पहिली टीम ठरली, आता तीन जागांसाठी 8 जणांमध्ये जोरदार चुरस

IPL 2022 : 57 मॅचनंतर 'प्ले ऑफ' ची पहिली टीम ठरली, आता तीन जागांसाठी 8 जणांमध्ये जोरदार चुरस

गुजरात टायटन्सनं आयपीएल 2022 (IPL 2022) ‘प्ले ऑफ’ चे तिकीट निश्चित केले आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी 8 टीममध्ये जोरदार चुरस आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे : गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) पुन्हा एकदा आयपीएल 2022 मधील पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी सलग दोन मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर गुजरातची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती. त्यांनी मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये जोरदार कमबॅक केले. गुजरातने लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 62 रननं पराभव करत पहिला क्रमांक पटकावला. या विजयासह गुजरातचे 18 पॉईंट्स झाले असून त्यांनी  ‘प्ले ऑफ’चं तिकीटही निश्चित केलं. आयपीएल 2022 मधील ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करणारी गुजरात ही पहिली टीम बनली आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी 8 टीममध्ये चुरस आहे. गुजरातकडू मोठा पराभव सहन केल्यानंतरही लखनऊ सुपर जायंट्सनं ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची मोठी संधी आहे. लखनऊचे आता 2 सामने बाकी असून त्यापैकी एक सामना जरी त्यांनी जिंकला तर त्यांची ‘प्ले ऑफ’ मधील जागा निश्चित होणार आहे. लखनऊनंतर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची मोठी संधी आहे. या दोन्ही टीमचे प्रत्येकी 14 पॉईंट्स आहेत. राजस्थानचे आणखी 3 तर बँगलोरचे आणखी 2 सामने बाकी आहेत. हे सर्व सामने त्यांनी जिंकले तर त्यांचा ‘प्ले ऑफ’मधील प्रवेश नक्की होईल. IPL 2022 : Live मॅचमध्ये हार्दिकनं लावला डोक्याला हात, Video Viral दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या टीमचे आणखी प्रत्येकी 3 सामने बाकी आहेत. त्यांनी हे सर्व सामने जिंकले तर 16 पॉईंट्ससह ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची त्यांना संधी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमना प्ले ऑफमध्ये जाण्याची सर्वात कमी संधी आहे. ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना त्यांच्या उर्वरित सर्व सामने चांगल्या रनरेटनं जिंकावे लागतील. त्याचबरोबर अन्य सामन्यांचे निकालही त्यांना अनुकूल पद्धतीनं लागावेत अशी प्रार्थना करावी लागेल. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये टॉप 2 मध्ये राहणाऱ्या टीमना ‘प्ले ऑफ’ मध्ये पहिला सामना गमावल्यानंतरही एक संधी असते. त्यामुळे टॉप 2 मध्ये पोहचण्याचा जास्तीत जास्त टीमचा प्रयत्न असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात