मुंबई, 4 जून : शुभमन गिलसाठी (Shubman Gill) आयपीएल 2022 (IPL 2022) चा सिझन दमदार ठरला. तो या सिझनमध्ये गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळला. त्यानं आयपीएलमधील 16 मॅचमध्ये 4 अर्धशतकासह 483 रन केले. शुभमननं आयपीएल फायनलमध्ये नाबाद 45 रन करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. गुजरात टायटन्सच्या आयपीएल विजेतेपदामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेल्या शुभमनवर आता नवी जबाबदारी आली आहे.
रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) नॉक आऊट राऊंडला आता सुरूवात होत आहे. या फेरीत शुभमन पंजाबकडून खेळू शकतो. तो या सामन्यांसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती पंजाब टीमचे मुख्य प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी दिली आहे. गिलनं रेड बॉल क्रिकेटमधील शेवटचा सामना डिसेंबर 2021 मध्ये खेळला होता. त्यावेळी न्यूझीलंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्यानं 4 इनिंगमध्ये 144 रन केले होते. त्यानंतर दुखापतीमुळे गिल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. रणजी स्पर्धेच्या लीग राऊंडमध्येही तो खेळला नव्हता. त्या राऊंडमध्ये पंजाबनं 3 मॅचमध्ये 16 पॉईंट्स कमावत ग्रुपमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता.
अर्शदीपची कमतरता जाणवणार
पंजाब टीमला पुढील सामन्यात फास्ट बॉलर अर्शदीप सिंगची (Arshdeep Singh) कमतरता जाणवणार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या अर्शदीपची दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. त्यामुळे अर्शदीप 9 जून पासून सुरू होणाऱ्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत खेळणार आहे. अर्शदीपच्या अनुपस्थितीमध्येही आमची टीम सज्ज आहे. 2013-14 नंतर पहिल्यांदा सेमी फायनलमध्ये जाण्याचं आमचं लक्ष्य आहे, अशी माहिती सुरेंद्र भावेनं दिली आहे.
WTC फायनलची जागा ठरली! 'या' मैदानात होणार चॅम्पियनचा फैसला
शुभमन गिलचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्यानं आत्तापर्यंत 33 सामन्यांतील 57 इनिंगमध्ये 57 च्या सरासरीनं 2828 रन केले आहेत. यामध्ये 7 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 268 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. पंजाबची रणजी क्वार्टर फायनलमध्ये लढत मध्य प्रदेशशी होणार आहे. या सामन्यात शुभमनकडून मोठ्या खेळीची पंजाबला अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Gujarat Titans, Ipl 2022, Punjab, Ranjit campionship