मुंबई, 4 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा दुसरा सिझन सुरू आहे. पहिल्या सिझनमध्ये न्यूझीलंडनं विजेतेपद पटकावलं होतं. या सिझनमध्ये न्यूझीलंडची टीम सहाव्या क्रमांकावर घसरली असून विजेतेपद पुन्हा एकदा मिळवण्याचा त्यांचा मार्ग चांगलाच खडतर झाला आहे. आगामी काही महिन्यांत न्यूझीलंड फायनलमध्ये जाणार की नाही? हे स्पष्ट होईल. त्याचवेळी आयससीसीनं या स्पर्धेच्या फायनलची जागा निश्चित केली आहे. इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्सवर (Lords Stadium, England) फायनल मॅच खेळवण्याची तयारी आयसीसीनं सुरू केली आहे. ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ या क्रिकेट वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार 2023 साली लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. आयसीसी कार्यकारी समितीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमधील साऊथम्पटनमध्ये झाली होती. ही फायनल लॉर्ड्सवर होणार होती. पण, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयसीसीनं फायनलची जागा बदलली होती. साऊथम्पटनमध्ये स्टेडिअमच्या जवळच हॉटेल होते. कोरोना काळात खेळाडूंना प्रवास करायला लागू नये म्हणून आयसीसीनं हा निर्णय घेतला होता. आयसीसीचे संचालक ग्रेग बार्कले यांनी बीसीसीशी बोलताना सांगितले की, ‘माझ्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लॉर्ड्सवर होणार हे निश्चित आहे. आमचा लॉर्ड्सवर फायनल खेळवण्याचा प्रयत्न आहे. जून महिन्यात ही फायनल होणार आहे. त्यामुळे अन्य स्टेडिअम आपोआप स्पर्धेतून बाद होतात. आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे लॉर्ड्सवर फायनलची सर्व व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे आमचा लॉर्ड्सवर फायनल खेळवण्याचा विचार आहे.’ IND vs SA : भारत दौऱ्यावरील दक्षिण आफ्रिकन खेळाडूचं आहे IPL टीमचा कॅप्टन होण्याचं स्वप्न इंग्लंड पुढील वर्षी उन्हाळ्यात अॅशेस सीरिजपूर्वी एका मालिकेचे यजमानपद भूषविणार आहे. त्या मालिकेसाठी प्रतिस्पर्धा टीम अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लॉर्ड्सवर होण्याची शक्यता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.