जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : राशिद खाननं केली धोनीची बरोबरी, सनसनाटी विजयानंतर केले जोरदार सेलिब्रेशन! VIDEO

IPL 2022 : राशिद खाननं केली धोनीची बरोबरी, सनसनाटी विजयानंतर केले जोरदार सेलिब्रेशन! VIDEO

IPL 2022 : राशिद खाननं केली धोनीची बरोबरी, सनसनाटी विजयानंतर केले जोरदार सेलिब्रेशन! VIDEO

उमरान मलिकच्या (Umran Malik) स्पेलमुळे गुजरातसाठी विजय अशक्य वाटत होता. त्या परिस्थितीमध्येही राहुल तेवातिया (Rahul Tewatia) आणि राशिद खान (Rashid Khan) यांनी शेवटच्या बॉलपर्यंत जिद्द न सोडता विजय खेचून आणला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 एप्रिल : गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) या आयपीएलमध्ये झालेल्या एकमेव पराभवाचा बदला घेतला आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये गुजरातनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 5 विकेट्सनं पराभव केला. उमरान मलिकच्या (Umran Malik) स्पेलमुळे गुजरातसाठी विजय अशक्य वाटत होता. त्या परिस्थितीमध्येही राहुल तेवातिया (Rahul Tewatia) आणि राशिद खान (Rashid Khan) यांनी शेवटच्या बॉलपर्यंत जिद्द न सोडता विजय खेचून आणला. गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रनची गरज होती. मार्को जेनसनच्या पहिल्या बॉलला सिक्स मारल्यानंतर तेवातियाने दुसऱ्या बॉलला एक रन काढून राशिद खानला स्ट्राईक दिला. यानंतर राशिदने तिसऱ्या आणि पाचव्या बॉलला सिक्स मारली, त्यामुळे गुजरातला अखेरच्या बॉलवर विजयासाठी 3 रन हवे होते, यानंतर अखेरच्या बॉलवर राशिदने पुन्हा एक सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला.  राशिदनं 4 बॉलमध्ये 3 सिक्स लगावले. आयपीएल स्पर्धेत दुसऱ्यांदा एखाद्या टीमनं शेवटच्या ओव्हरमध्ये 22 किंवा त्यापेक्षा जास्त रन करत मॅच जिंकली आहे. यापूर्वी 2016 साली महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना पंजाब किंग्जच्या विरूद्ध 23 रन करत विजय मिळवला होता. त्यावेळी अक्षर पटेलनं टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं 3 सिक्स आणि 1 फोर लगावला होता. एक रन वाईड बॉलनं मिळाला. राशिद खाननं मार्को जेनसनच्या एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स लगावत धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

जाहिरात

या मॅचमध्ये दोन्ही टीमनं शेवटच्या ओव्हरमध्ये 25 रन केले. हैदराबाद बॅटींग करत असताना लॉकी फर्ग्युसननं शेवटची ओव्हर टाकली. त्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मार्को जेनसेननं सिक्स लगावला. दुसऱ्या बॉलवर एकही रन निघाला नाही. तिसऱ्या बॉलवर त्यानं एक रन काढला. त्यानंतर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच बॅटींग करत असलेल्या शशांक सिंहनं तीन सिक्स लगावत टीमचा स्कोअर 190 च्या पुढे नेला. IPL 2022 : … म्हणून गुजरात टायटन्स टॉपवर! वाचा हार्दिकच्या टीमच्या विजयाचे रहस्य हैदराबादने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली. ऋद्धीमान साहाने 38 बॉलमध्ये 68 रन केले, तर गिलने 22 रनची खेळी करून साहाला साथ दिली. राहुल तेवातियाने 21 बॉलमध्ये नाबाद 40 आणि राशिद खानने 21 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. हैदराबादकडून उमरान मलिकने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 5 विकेट घेतल्या. उमरानशिवाय हैदराबादच्या अन्य कोणत्याही बॉलरला विकेट मिळाली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात