मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 ची फायनल आता काही तासांवर आली आहे. या संपूर्ण सिझनमध्ये सातत्यपूर्ण खेळ केलेल्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात ही फायनल होणार आहे. दोन्ही टीमच्या कौशल्याचा कस फायनलमध्ये लागणार असून यामध्ये राजस्थान रॉयल्सला गुजरातच्या एका खेळाडूपासून सावध राहावं लागणार आहे. कारण हा एकच खेळाडू राजस्थानमधील 7 जणांवर भारी आहे.
गुजरात टायटन्सचा व्हाईस कॅप्टन आणि अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानचा (Rashid Khan) रेकॉर्ड राजस्थानच्या प्लेईंग 11 मधील 7 जणांवर भारी आहे. यशस्वी जैयस्वालनं राशिद विरूद्ध 9 बॉलमध्ये 13 रन केले असून तो एकवेळा आऊट झाला आहे. या सिझनमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या जोस बटलरचा रेकॉर्ड तर आणखी खराब आहे. बटलरनं राशिद विरूद्ध 41 बॉलमध्ये फक्त 25 रन काढले असून त्यामध्ये तो 4 वेळा आऊट झाला आहे. विशेष म्हणजे बटलरला राशिद विरूद्ध आजवर एकही बाऊंड्री मारता आलेली नाही.
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं 77 बॉलमध्ये 73 रन केले असून या दरम्यान तो एकवेळा आऊट झालाय. देवदत्त पडिक्कलची 20 बॉलमध्ये 16 रन आणि 1 वेळा आऊट अशी कामगिरी आहे. शिमरॉन हेटमायरनं 45 बॉलमध्ये 63 रन काढले आहेत पण तो 4 वेळा आऊट झालाय. रियान पराग अजून राशिदला एकदाही आऊट झालेला नाही. पण त्यानं फक्त 7 बॉल खेळले असून त्यामध्ये 6 रन काढले आहेत. तर आर. अश्विननं 6 बॉलमध्ये 7 रन काढले असून त्यामध्ये तो 2 वेळा आऊट झाला आहे.
IPL 2022 Final, GT vs RR Dream 11 : गुजरात-राजस्थानच्या फायनलमध्ये 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश
राशिद खाननं आजवर टी20 लीगच्या 5 फायनल खेळल्या असून त्यामध्ये त्याला 2 विकेट्सच मिळाल्या असल्या तरी त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 5.27 आहे. त्यामुळे आयपीएल फायनलमध्येही राशिदला खेळताना राजस्थानची टीम दबावात असेल. त्याचा फायदा गुजरातच्या अन्य बॉलर्सना होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.