Home /News /sport /

IPL 2022 Final, GT vs RR Dream 11 : गुजरात-राजस्थानच्या फायनलमध्ये 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश

IPL 2022 Final, GT vs RR Dream 11 : गुजरात-राजस्थानच्या फायनलमध्ये 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश

या सिझनमध्ये 10 टीम सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) या टीममध्ये फायनल होणार आहे.

    मुंबई, 29 मे : आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनची (IPL 2022) फायनल आज (रविवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. या सिझनमध्ये 10 टीम सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) या टीममध्ये फायनल होणार आहे. राजस्थानला 2008 नंतर 14 वर्षांनी तर गुजरातला पहिल्याच सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. या दोन्ही टीमनं संपूर्ण सिझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरातमं लीग स्टेजमध्ये 14 पैकी 10 सामने जिंकत पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला. तर राजस्थान रॉयल्स 14 पैकी 9 सामने जिंकत दुसऱ्या क्रमांकावर होती. राजस्थानचा जोस बटलरनं (Jos Buttler) या सिझनमधील 16 सामन्यांत 824 रन केले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याकडून आजही चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. राजस्थानच्या बॅटींगची भिस्त बटलरवर असली तरी फायनलमध्ये कॅप्टन संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर यांच्याकडूनही अपेक्षा असेल. तर गुजरातकडून डेव्हिड मिलर (David Miller) संकटमोचक ठरला आहे. मिलरनं 15 सामन्यात 449 रन केले आहेत. त्यानं पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रसिद्ध कृष्णाला सलग 3 सिक्स लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मोहम्मद शमी आणि राशिद खानवर गुजरातच्या बॉलिंगची भिस्त असेल. गुजरात टायटन्सच्या होम ग्राऊंडवर ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे फॅन्सचा पाठिंबा हार्दिक पांड्याला जास्त असेल. IPL 2022 GT vs RR final Dream 11 कॅप्टन: जोस बटलर व्हाईस कॅप्टन: डेव्हिड मिलर विकेट किपर: ऋद्धीमान साहा बॅटर: शुभमन गिल, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर ऑल राऊंडर: हार्दिक पंड्या, आर अश्विन बॉलर: मोहम्मद शमी, राशिद खान, युजवेंद्र चहल IPL 2022 मध्ये मारला सर्वात लांब सिक्स, इंग्लंडमध्ये स्टेडिअम बाहेर टोलावला बॉल, VIDEO  गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कॅप्टन), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंह, बी साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानुल्ला गुरबाज, ऋद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नालकंडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, आर. साई किशोर, वरुण आरोन, यश दयाल. राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, रियान पराग, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेद मैकॉय, अनुनय सिंह, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढ़वाल, जेम्स नीशाम, नाथन कूल्टर-नाइल, रेसी वान डेर डुसेन, डेरिल मिशेल आणि कॉर्बिन बॉश.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या