जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, GT vs RR : पहिल्या क्वालिफायरपूर्वी नेहरानं लगावली चहलला किक, पाहा Photo

IPL 2022, GT vs RR : पहिल्या क्वालिफायरपूर्वी नेहरानं लगावली चहलला किक, पाहा Photo

IPL 2022, GT vs RR : पहिल्या क्वालिफायरपूर्वी नेहरानं लगावली चहलला किक, पाहा Photo

गुजरात टायटन्सचे हेड कोच आशिष नेहरानं (Ashish Nehra) या क्वालिफायरपूर्वी राजस्थानचा बॉलर युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) एक किक लगावली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मे : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन्ही टीमना आज (मंगळवार) होणारा सामना जिंकून फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थानला पहिल्या सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. कोलकातामधील इडन गार्डनवर होणाऱ्या या क्वालिफायर 1 साठी दोन्ही टीम जोरदार सराव करत आहे. गुजरात टायटन्सचे हेड कोच आशिष नेहरानं (Ashish Nehra) या क्वालिफायरपूर्वी राजस्थानचा बॉलर युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) एक किक लगावली. गुजरात टायटन्सनंच सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले असून ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. अर्थात हा सर्व प्रकार मजेत सुरू होता. नेहरा आणि चहल या दोघांनाही याची कल्पना होती.

जाहिरात

गुजरात टायटन्सनं नेहरा आणि चहलचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे की, ‘युझी आणि नेहराजी यांना या किकमुळे चाांगलाच उत्साह आला आहे.’ नेहरा आणि चहल हे दोघंही दिलखुलास हसत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. आयपीएल क्वालिफायरपूर्वी दोन्ही टीमनं सोमवारी इडन गार्डनवर सराव केला. त्यावेळी हे खेळाडू परस्परांना भेटले.  गुजरातनं 14 पैकी 10 तर राजस्थाननं 14 पैकी 9 सामने जिंकून ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. IPL 2022, GT vs RR Dream 11 : पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य या सिझनमधील राजस्थान रॉयल्सच्या दमदार कामगिरीत चहलचा मोठा वाटा आहे. लीग स्टेजमध्ये राजस्थानच्या बॉलर्सनं एकूण 84 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी जवळपास एक तृतीयांश विकेट्स चहलनं घेतल्या आहेत. त्यानं या सिझनमध्ये एक वेळा 4 आणि 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच हॅट्ट्रिकही केली आहे.चहलनं दर 13 बॉलमध्ये एक विकेट घेतली असून तो राजस्थानचा मॅच विनर आहे. चहलच्या बॉलिंगपासून वाचण्यासाठी नेहरा गुजरातच्या खेळाडूंना काय टिप्स देतो आणि त्या टिप्सची सर्वजण किती अंमलबजावणी करतात यावर या मॅचचा निकाल अवलंबून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात