जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL मध्ये संधी न दिल्याचा निघाला आफ्रिकेवर राग, बांगलादेशचा आफ्रिकेत ऐतिहासिक विजय

IPL मध्ये संधी न दिल्याचा निघाला आफ्रिकेवर राग, बांगलादेशचा आफ्रिकेत ऐतिहासिक विजय

IPL मध्ये संधी न दिल्याचा निघाला आफ्रिकेवर राग, बांगलादेशचा आफ्रिकेत ऐतिहासिक विजय

बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेतील वन-डे सीरिज 2-1 या फरकानं जिंकली. बांगलादेशी बॉलरनं आयपीएल स्पर्धेत संधी न मिळाल्याचा राग आफ्रिकन टीमवर काढला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मार्च :  बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या वन-डेमध्ये  (SA v BAN 3rd ODI) 9 विकेट्सनं पराभव केला आहे. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची वन-डे सीरिज 2-1 या फरकानं जिंकली. बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच वन-डे सीरिज जिंकली आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्यांदा बॅटींग करत फक्त 154 रनवर ऑल आऊट झाली. बांगलादेशनं हे आव्हान फक्त 1 विकेट्सटच्या मोबदल्यात आणि 26.3 ओव्हर्समध्येच पूर्ण केले. बांगलादेशचा फास्ट बॉलर तस्किन अहमद  (Taskin Ahmed) या मॅचचा हिरो ठरला. आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) जखमी मार्क वूडच्या जागी तस्किकनची निवड जवळपास निश्चित केली होती. पण, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही.  तस्किननं आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याचा राग आफ्रिकेच्या टीमवर काढत  5 विकेट्स घेतल्या. तस्किननं 9 ओव्हर्समध्ये 35 रन देत 5 विकेट्स घेतल्या. लसिथ मलिंगानंतर तब्बल 10 वर्षांनी एखाद्या विदेशी बॉलरनं आफ्रिकेतील वन-डे मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.

जाहिरात

तस्किननं त्याच्या वन-डे कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. क्रिकेटमधील SENA देशांमधील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) वन-डे मॅचमध्ये कोणत्याही बांगलादेशी बॉलरनं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तस्किननं यापूर्वी पहिल्या वन-डेमध्येही 3 विकेट्स घेत विजयात मोलाचे योगदान दिले होते. PAK vs AUS : बॉल स्टम्पला लागला, बेल्स पडल्या नाहीत तरी अंपायरने दिलं Out! पाहा कारण बांगलादेशकडून कॅप्टन तमिम इक्बालनं (Tamim Iqbal) 82 बॉलमध्ये नाबाद 87 रनची खेळी केली. तमिमच्या कारकिर्दीमधील ही 52 वी हाफ सेंच्युरी आहे. लिंटन दासनं 57 बॉलमध्ये 48 रन केले. तर शाकिब अल हसननं 20 बॉलमध्ये 2 फोरच्या मदतीनं नाबाद 18 रन करत बांगलादेशला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात