मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : चहलची चूक राजस्थानवर भारी, 27 विकेट्सवर पडलं पाणी! पाहा VIDEO

IPL 2022 : चहलची चूक राजस्थानवर भारी, 27 विकेट्सवर पडलं पाणी! पाहा VIDEO

युझवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) आयपीएल फायनलमध्ये केलेली चूक राजस्थान रॉयल्सवर भारी पडली. या चुकीमुळे चहलच्या 27 विकेट्सच्या मेहनतीवर पाणी पडले.

युझवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) आयपीएल फायनलमध्ये केलेली चूक राजस्थान रॉयल्सवर भारी पडली. या चुकीमुळे चहलच्या 27 विकेट्सच्या मेहनतीवर पाणी पडले.

युझवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) आयपीएल फायनलमध्ये केलेली चूक राजस्थान रॉयल्सवर भारी पडली. या चुकीमुळे चहलच्या 27 विकेट्सच्या मेहनतीवर पाणी पडले.

मुंबई, 30 मे : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) आयपीएल 2022 मधील यशामध्ये युझवेंद्र चहलचं (Yuzvendra Chahal) मोठं योगदान आहे. चहलनं या सिझनमध्ये सर्वाधिक 27 विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली. चहलनं फायनलमध्येही 4 ओव्हर्समध्ये फक्त 20 रन देत हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) महत्त्वाची विकेट घेतली. या सर्व कामगिरीनंतरही चहलची एक चूक राजस्थान रॉयल्सनं कायम सतावणार आहे.

काय झाली चूक?

गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) इनिंगमधील पहिल्याच ओव्हरमध्ये ही चूक झाली. राजस्थानकडून ट्रेंन्ट बोल्ट ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शुभमन गिलचा कॅच चहलनं सोडला. आयपीएल फायनलमध्ये राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत फक्त 130 रन केले होते. या कमी स्कोरचं संरक्षण करण्यासाठी राजस्थानला सुरूवातीलचा विकेट मिळणे आवश्यक होते. बोल्टनं ती संधी पहिल्याच ओव्हरला निर्माण केली होती. पण, चहलनं कॅच सोडल्यानं गिलला जीवदान मिळाले.

शुभमन गिलनं या जीवदानाचा फायदा घेतला. त्यानं गुजरातची संपूर्ण इनिंग बॅटींग करत 43 बॉलवर नाबाद 45 रन काढले. गिलनंच 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सिक्स लगावत गुजरातच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रनच करता आले. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याशिवाय साई किशोरला 2 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद शमी, यश दयाळ आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. राजस्थानकडून बटलरने सर्वाधिक 39 तर यशस्वी जयस्वालने 22 रन केले, या दोघांशिवाय राजस्थानच्या कोणत्याच खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही.

IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सवर धनवर्षाव, पराभवानंतरही राजस्थान मालामाल

गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 45 रन केले, तर हार्दिक पांड्या 30 बॉलमध्ये 34 रन करून आऊट झाला. डेव्हिड मिलरने 19 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले. राजस्थानकडून बोल्ट, कृष्णा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals, Yuzvendra Chahal