मुंबई, 30 मे : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेट्सनं पराभव करत आयपीएल 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. राजस्थाननं दिलेलं 131 रनचं आव्हान गुजरातनं 18.1 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. हार्दिक पांड्याला त्याच्या ऑल राऊंड कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हार्दिकनं 3 विकेट्स घेतल्या. तसंच 34 रनची उपयुक्त खेळी केली.
गुजरात टायटन्सनं त्यांच्या पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या विजेतेपदानंतर गुजरातला आकर्षक ट्रॉफीसह 20 कोटी रूपयांचा चेक बक्षीस म्हणून देण्यात आला. तर उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला 13 कोटी मिळाले. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 50 लाखांनी जास्त आहे. गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला उपविजेतेपद पटकावल्यानंतर 12 कोटी 50 लाख रूपये मिळाले होते.आयपीएल चॅम्पियन टीमच्या बक्षिसामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला 20 कोटी मिळाले होते.गेल्या 4 वर्षांपासून आयपीएल विजेत्या टीमला 20 कोटी रूपये बक्षीस म्हणून दिले जात आहेत.
आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये खेळणाऱ्या टीमवरही धनवर्षाव होणार आहे. तिसऱ्या नंबरच्या (क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेल्या) टीमला 7 कोटी चौथ्या क्रमांकावरच्या टीमला 6.5 कोटी रूपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. याचाच अर्थ राजस्थान रॉयल्सकडून क्वालिफायर 2 मध्ये पराभूत होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 7 कोटी तर लखनऊ सुपर जायंट्सला साडे सहा कोटी रूपये मिळाले.
IPL 2022 Final : गुजरात जिंकताच हार्दिकची बायको नताशा इमोशनल, Video Viral
राजस्थान रॉयल्सला आयपीएल विजेतेपद पटकावण्यात अपयश आलं असलं तरी त्यांच्या खेळाडूंनी वैयक्तिक पुरस्कारात बाजी मारली. एकट्या जॉस बटलरनं (Jos Buttler) 6 पुरस्कार पटकावले. राजस्थानच्याच युजवेंद्र चहलनं सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Rajasthan Royals