मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 Final : गुजरात जिंकताच हार्दिकची बायको नताशा इमोशनल, Video Viral

IPL 2022 Final : गुजरात जिंकताच हार्दिकची बायको नताशा इमोशनल, Video Viral

गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) चांगलीच इमोशनल झाली होती.

गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) चांगलीच इमोशनल झाली होती.

गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) चांगलीच इमोशनल झाली होती.

मुंबई, 30 मे : गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच सिझनमध्ये विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या फायनलमध्ये गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 7 विकेट्सनं पराभव केला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या राजस्थानला गुजरातनं 130 रनवरच रोखलं. त्यानंतर 131 रनचं आव्हान आरामात पूर्ण करत विजेतेपद पटकावलं.

या विजयानंतर गुजरात टायटन्सची संपूर्ण टीम खूश होती. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) चांगलीच इमोशनल झाली होती. गुजरातनं विजेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नताशा मैदानात आली आणि तिनं हार्दिकला मिठी मारली. यावेळी नताशाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती चांगलीच भावुक झाली होती. हार्दिकनं तिला सावरलं.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रनच करता आले. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या.  हार्दिकनं संजू सॅमसन, जॉस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या राजस्थानच्या तीन प्रमुख खेळाडूंना आऊट केल. त्यानंतर त्यानं 30 बॉलमध्ये 34 रन काढले.

IPL 2022 : जॉस बटलरला मिळाली ऑरेंज कॅप, वाचा स्पर्धेतील पुरस्कारांची संपूर्ण यादी

हार्दिक पांड्यासाठी हा आयपीएल सिझन अत्यंत महत्त्वपूर्ण होता. खराब फिटनेसचा मोठा परिणाम त्याच्या खेळावर झाला होता. टी20 वर्ल्ड कपनंतर त्याला टीम इंडियातील जागाही गमवावी लागली. मुंबई इंडियन्सनंही त्याला रिटेन केले नाही.  त्या परिस्थितीमध्ये हार्दिकनं नव्या टीमच्या कॅप्टनसीची जबाबदारी समर्थपणे सांभाळात थेट आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हार्दिकनं या सिझनमध्ये 131 च्या स्ट्राईक रेटनं 487 रन केले आणि 8 विकेट्स घेतल्या. हार्दिकचे सर्व कष्ट जवळून पाहिलेल्या नताशाला गुजरात टायटन्सनं विजेतेपद पटकावल्यानंतर स्वत:च्या भावना आवरता आल्या नाहीत.

First published:

Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Rajasthan Royals