मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : जॉस बटलरला मिळाली ऑरेंज कॅप, वाचा स्पर्धेतील पुरस्कारांची संपूर्ण यादी

IPL 2022 : जॉस बटलरला मिळाली ऑरेंज कॅप, वाचा स्पर्धेतील पुरस्कारांची संपूर्ण यादी

राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. या पराभवानंतरही आयपीएल स्पर्धेतील पुरस्कारांवर राजस्थानच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं.

राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. या पराभवानंतरही आयपीएल स्पर्धेतील पुरस्कारांवर राजस्थानच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं.

राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. या पराभवानंतरही आयपीएल स्पर्धेतील पुरस्कारांवर राजस्थानच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं.

मुंबई, 30 मे : राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सनं (GT vs RR) त्यांचा 7 विकेट्सनं पराभव केला. या पराभवानंतरही आयपीएल स्पर्धेतील पुरस्कारांवर राजस्थानच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. एकट्या जॉस बटलरनं (Jos Buttler) 6 पुरस्कार पटकावले. यामध्ये सर्वाधिक रन काढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ऑरेंज कॅपचाही समावेश आहे.

सनरायझर्स हैदराबादला (SRH) 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यात अपयश आलं. पण. त्यांचा फास्ट बॉलर उमरान मलिकची (Umran Malik) इमर्जिंग प्लेयर म्हणून निवड झाली आहे. त्यानं या सिझनमध्ये सातत्यानं 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत एकूण 22 विकेट्स घेतल्या. आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनमध्ये (IPL 2022) कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूया...

आयपीएल 2022 मधील पुरस्कार

इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिझन: उमरान मलिक (10 लाख )

मोस्ट सिक्सेस ऑफ द सिजन : जॉस बटलर (10 लाख )

सुपर स्ट्राइकर ऑफ द सिझन : दिनेश कार्तिक (10 लाख, टाटा पंच कार )

गेम चेंजर अवॉर्ड : जॉस बटलर (10 लाख)

फेयर प्ले अवॉर्ड : गुजरात टायटन्स आणि  राजस्थान रॉयल्स

पॉवर प्लेयर ऑफ द सिझन: जॉस बटलर (10 लाख)

फास्टेस्ट बॉल ऑफ द सिजन : लॉकी फर्ग्यूसन (157.3KPH)

मोस्ट 4 ऑफ द सिजन : जॉस बटलर (10 लाख)

पर्पल कॅप : युजवेंद्र चहल (27 विकेट, 10 लाख)

ऑरेंज कॅप : जॉस बटलर (863 रन, 10 लाख)

कॅच ऑफ द सिजन : एविन लुईस (10 लाख)

मोस्ट व्हॅल्यूबल प्लेयर ऑफ द सिजन : जॉस बटलर (10 लाख)

IPL 2022 Final: RR चं 14 वर्षांनी स्वप्न तुटलं, 'या' 5 कारणांमुळे झाला फायनलमध्ये पराभव

जॉस बटलरनं या सिझनमध्ये 4 शतक झळकाले. एका सिझनमध्ये सर्वाधिक शतक करण्याच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रेकॉर्डची त्यानं बरोबरी केली. बटलरनं आयपीएल 2022 मध्ये एकूण 83 फोर आणि 45 सिक्स लगावले. आयपीएलच्या कोणत्याही एका सिझनमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहलीनंतर बटलर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राजस्थान रॉयल्सच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात त्याचे मोठे योगदान होते.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals