मुंबई, 30 मे : गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) आयपीएल फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 7 विकेट्सनं पराभव केला. दोन्ही स्पर्धेचा स्पर्धेतील प्रवास पाहाता फायनल मॅच चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात गुजरातनं अगदी आरामात राजस्थानचा पराभव केला. लीग मॅचेसमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरातनं 'प्ले ऑफ' मधील दोन्ही सामने जिंकत विजेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) ऑल राऊंड खेळामुळे गुजरातला फायनलमध्ये विजय मिळाला.
हार्दिकनं यावेळी गुजरातचा कॅप्टन म्हणून एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा (Rohit Shatrma) यांच्यासह टी20 लीगमधील कोणत्याही टीमच्या कॅप्टनला आजवर कधीही जमलं नाही ते हार्दिकनं कॅप्टन म्हणून पहिल्याच स्पर्धेत केलं आहे. कोणत्याही टी20 लीगच्या फायनलमध्ये 3 विकेट्स आणि 25 पेक्षा जास्त रन करणारा पांड्या हा पहिला कॅप्टन ठरला आहे.
हार्दिक पांड्याला मिळालेल्या तिन्ही विकेट या राजस्थान रॉयल्सचे मुख्य खेळाडू होते. हार्दिक पांड्याने सगळ्यात पहिले राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) 14 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर हार्दिकला या आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी खेळाडू असलेल्या जॉस बटलरची विकेट मिळाली. या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन केलेला बटलर (Jos Buttler) 39 रनवर खेळत होता, पण तो आणखी धोकादायक ठरण्याच्या आधीच हार्दिकने त्याला आऊट केले.
Hardik Pandya is the first captain to score 25 runs and take 3 wickets in the final of a franchise-based T20 tournament.#IPLFinal #IPL2022 #GTvRR
— Rajneesh Gupta (@rgcricket) May 29, 2022
संजू सॅमसन आणि बटलरची विकेट घेतल्यानंतर हार्दिकने शिमरन हेटमायरला आपल्याच बॉलिंगवर 11 रनवर कॅच आऊट केलं. या तीन धक्क्यानंतर राजस्थानची टीम सावरलीच नाही. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 130 रन केले. 131 रनचा पाठलाग करताना गुजरातची अवस्था पाचव्या ओव्हरमध्ये 2 आऊट 23 अशी झाली होती.
IPL 2022 : चहलची चूक राजस्थानवर भारी, 27 विकेट्सवर पडलं पाणी! पाहा VIDEO
फायनलमधील त्या नाजूक परिस्थितीमध्ये बॅटींगला आलेल्या हार्दिकनं शांतपणे खेळ केला. त्याने शुभमन गिल सोबत तिसऱ्या विकेटसाठी 63 रनची भागिदारी केली. हार्दिक 30 बॉलमध्ये 34 रन काढून आऊट झाला. पण, तोपर्यंत मॅच गुजरातच्या आवाक्यात आली होती. गिल आणि मिलर जोडीनं उरलेली औपचारिकता पूर्ण करत गुजरात टायटन्सला पहिल्याच सिझनमध्ये विजेतेपद मिळवून दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Rajasthan Royals