मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: 7 नंबर जर्सी, SIX आणि संगकारा-मलिंगाचा पराभव! 11 वर्षांनी झाली इतिहासाची पुनरावृत्ती

IPL 2022: 7 नंबर जर्सी, SIX आणि संगकारा-मलिंगाचा पराभव! 11 वर्षांनी झाली इतिहासाची पुनरावृत्ती

आयपीएल फायनलमध्ये घडलेल्या एका योगायोगामुळे सर्वांना 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल आणि महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण येत आहे.

आयपीएल फायनलमध्ये घडलेल्या एका योगायोगामुळे सर्वांना 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल आणि महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण येत आहे.

आयपीएल फायनलमध्ये घडलेल्या एका योगायोगामुळे सर्वांना 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल आणि महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण येत आहे.

मुंबई, 30 मे : आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये (IPL 2022 Final) गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावले. गुजरातच्या शुभमन गिलनं (Shubman Gill) सिक्स लगावत गुजरातच्या विजेतपदावर शिक्कामोर्तब केले. गुजरात टायटन्सनं पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर या फायनलमध्ये घडलेल्या एका योगायोगामुळे सर्वांना 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल आणि महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण येत आहे.

काय आहे कारण?

शुभमन गिल देखील धोनीप्रमाणेच 7 नंबरची जर्सी घालतो. त्यानं आयपीएल फायनलमध्ये सिक्स मारत गुजरातला दिलेले 131 रनचे टार्गेट पूर्ण केले. महेंद्रसिंह धोनीनं 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये नुवान कुलसेखराच्या बॉलवर सिक्स मारत टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. हा योगायोग इथंच थांबत नाही.

2011 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आशिष नेहरा टीम इंडियाचा सदस्य होता आणि गॅरी कस्टर्न टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. लसिथ मलिंगा आणि कुमार संगकारा हे श्रीलंका टीमचे सदस्य होते. या आयपीएलमध्ये नेहरा गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक तर कस्टर्न मेंटॉर आहे. तर मलिंगा आणि संगकारा ही जोडी राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफची सदस्य आहे. आयपीएल 2022 मधील विजेतेपदानंतर गुजरात टायटन्सनं दोन घटनांमधील साम्य सांगणारं ट्विट केलं असून ते चांगलंच व्हायरल झालं आहे.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 130 रनच करता आले.राजस्थानने दिलेलं 131 रनचं आव्हान गुजरातने 18.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. शुभमन गिलने  43 बॉलमध्ये नाबाद 45 रन केल्या, तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 30 बॉलमध्ये 34 रन करून आऊट झाला. डेव्हिड मिलरने 19 बॉलमध्ये नाबाद 32 रन केले.

IPL 2022 : फायनलमधील पराभवाचं संगकारानं फोडलं अश्विनवर खापर! दिग्गज स्पिनरबद्दल म्हणाला...

हार्दिकनं यावेळी गुजरातचा कॅप्टन म्हणून एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा (Rohit Shatrma) यांच्यासह टी20 लीगमधील कोणत्याही टीमच्या कॅप्टनला आजवर कधीही जमलं नाही ते हार्दिकनं कॅप्टन म्हणून पहिल्याच स्पर्धेत केलं आहे. कोणत्याही टी20 लीगच्या फायनलमध्ये 3 विकेट्स आणि 25 पेक्षा जास्त रन करणारा पांड्या हा पहिला कॅप्टन ठरला आहे.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals