मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : फायनलमधील पराभवाचं संगकारानं फोडलं अश्विनवर खापर! दिग्गज स्पिनरबद्दल म्हणाला...

IPL 2022 : फायनलमधील पराभवाचं संगकारानं फोडलं अश्विनवर खापर! दिग्गज स्पिनरबद्दल म्हणाला...

आयपीएल 2022 मधील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारानं (Kumar Sangakkara) या पराभवानंतर अश्विनवर नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल 2022 मधील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारानं (Kumar Sangakkara) या पराभवानंतर अश्विनवर नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल 2022 मधील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारानं (Kumar Sangakkara) या पराभवानंतर अश्विनवर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई, 30 मे : आयपीएल 2022 मधील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारानं (Kumar Sangakkara) या पराभवानंतर अश्विनवर नाराजी व्यक्त केली आहे. 'अश्विन महान क्रिकेटपटू आहे, पण त्यानं अधिक सुधारणा करत पारंपारिक ऑफ ब्रेक बॉल जास्त टाकला पाहिजे,' असं मत संगकारानं व्यक्त केलं आहे.  अनुभवी अश्विननं 'प्ले ऑफ' मध्ये साफ निराशा केली. त्यानं तीन मॅचमध्ये 100 पेक्षा जास्त रन देत फक्त 1 विकेट घेतली.

अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये 442 विकेट्स घेतल्या असून तो या प्रकारातील भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर आहे. त्यानं या आयपीएल सिझनमधील 17 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या. अश्विनच्या कामगिरीबद्दल बोलताना संगकारा म्हणाला की, 'क्रिकेटधील त्याचे योगदान मोठे आहे, त्यामुळे तो महान क्रिकेटर आहे. त्यानंतरही त्याच्यात सुधारणेला वाव आहे. त्यानं विशेषत: ऑफ स्पिन बॉलिंग जास्त केली पाहिजे.' आर. अश्विननं फायनलमध्ये ऑफ स्पिनपेक्षा कॅरम बॉल जास्त टाकला. त्यानं फायनलमध्ये 3 ओव्हर्समध्ये 32 रन दिले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

राजस्थाननं फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत 9 आऊट 130 रन केले. ते रन पुरेसे नव्हते, असं संगकारानं मान्य केलं. तो यावेळी म्हणाला की, '130 रन पुरेसे नव्हते. टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याबाबतही आम्ही चर्चा केली होती. आम्ही मैदानात गेलो त्यावेळी पिच कोरडे आढळले. ते नंतर आणखी स्लो झाले तर आमच्या स्पिनर्सना फायदा होईल असे आम्हाला वाटले. आम्हाला 160 ते 165 रनची अपेक्षा होती. आम्ही पहिल्या 10 ओव्हरमध्ये चांगले रन केले होते. पण, संजू आऊट झाल्यानंतर बॉलर्सनी दबाव वाढवला. आम्ही 'पॉवर प्ले' मध्ये काही विकेट्स काढल्या पण शुभनन गिलला जीवदान देणे महाग पडले.'

मुंबई इंडियन्सचा खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून खेळणार, कॅप्टन फिंचनं केलं जाहीर

राजस्थान रॉयल्सनं या सिझनमध्ये चांगली कामगिरी करत फायनलपर्यंत धडक मारली. त्यानंतरही कामगिरीमध्ये आणखी सुधारणा आवश्यक असल्याचं संगकारानं सांगितलं. 'आम्हाला बऱ्याच क्षेत्रामध्ये सुधारणेची गरज आहे. जोस बटलर, संजू आणि हेटमारनं चांगले रन केले. रियान पराग आणि देवदत्त पडिक्कल यांनी काही वेळा चांगली कामगिरी केली. त्यांनी अधिक योगदान देण्याची गरज आहे.' असे संगकारा म्हणाला.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, R ashwin, Rajasthan Royals