मुंबई, 28 एप्रिल : आयपीएल 2022 मधील बुधवारी झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा (GT vs SRH) 5 विकेट्सनं पराभव केला. या पराभवानंतरही हैदराबादच्या उमरान मलिकला (Umran Malik) ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला. उमराननं या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 25 रन देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीनंतर उमरानचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला (Umran Malik Photo Viral) आहे. या फोटोमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) उमरानला पाठीमागून पकडलंय. तर उमराननं हात जोडले आहेत. ‘विस्डेन इंडियानं’ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी ‘सॉरी सिनिअर’ हे कॅप्शन दिलं. खेळकर भावनेनं शेअर करण्यात आलेल्या या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. हार्दिकला आऊट केल्याबद्दल उमरान नताशाची माफी मागत आहे, अशी प्रतिक्रिया एका युझरनं या फोटोवर दिली आहे.
Sorry senior 😅#HardikPandya #UmranMalik #IPL2022 #Cricket pic.twitter.com/Vv1MpMwwjW
— Wisden India (@WisdenIndia) April 27, 2022
Upar pandya ki wife ki sorry bol rha hai
— Sir Einstein (@Arhanbhat9) April 27, 2022
हैदराबादने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली. ऋद्धीमान साहाने 38 बॉलमध्ये 68 रन केले, तर गिलने 22 रनची खेळी करून साहाला साथ दिली. राहुल तेवातियाने 21 बॉलमध्ये नाबाद 40 आणि राशिद खानने 21 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. हैदराबादकडून उमरान मलिकने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 5 विकेट घेतल्या, या 5 पैकी 4 बॅटर बोल्ड झाले. उमरान मलिकशिवाय हैदराबादच्या इतर कोणत्याच बॉलरला विकेट मिळाली नाही. IPL 2022 : उमरान मलिकच्या वेगानं गावसकर प्रभावित, BCCI ला दिला खास सल्ला राशिद खान (Rashid Khan) आणि राहुल तेवातिया (Rahul Tewatia) या विजयाचे शिल्पकार ठरले. राशिदनं शेवटच्या ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावत गुजरातला विजय मिळवून दिला.