मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: धोनी चेन्नईकडून खेळणार की नाही? नियमांमुळे वाढलं CSK चं टेन्शन

IPL 2022: धोनी चेन्नईकडून खेळणार की नाही? नियमांमुळे वाढलं CSK चं टेन्शन

सीएसकेनं आयपीएल फायनलमध्ये केकेआरचा (IPL 2021 Final CSK vs KKR) हे विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदानंतर धोनी पुढच्या वर्षीचं आयपीएल खेळणार की नाही? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

सीएसकेनं आयपीएल फायनलमध्ये केकेआरचा (IPL 2021 Final CSK vs KKR) हे विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदानंतर धोनी पुढच्या वर्षीचं आयपीएल खेळणार की नाही? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

सीएसकेनं आयपीएल फायनलमध्ये केकेआरचा (IPL 2021 Final CSK vs KKR) हे विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदानंतर धोनी पुढच्या वर्षीचं आयपीएल खेळणार की नाही? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई, 18 ऑगस्ट:  महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) यंदा चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. सीएसकेनं फायनलमध्ये केकेआरचा (IPL 2021 Final CSK vs KKR) हे विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदानंतर धोनी पुढच्या वर्षीचं आयपीएल खेळणार की नाही? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार धोनी आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सीएसकेचा सदस्य असेल. सीएसकेलाही त्याला सोडण्याची इच्छा नाही. पण बीसीसीआयच्या नियमामुळे फ्रँचायझीचं टेन्शन वाढलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यानं याबाबत दिलेल्या माहितीनुसार, धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही हा निर्णय नियमांची माहिती मिळाल्यानंतरच घेतला जाईल. पुढील आपीएलमध्ये किती खेळाडू रिटेन करण्यात येणार आहे याचे नियम अजून तयार करण्यात आलेले नाहीत. पुढील आयपीएल सिझनमध्ये 2 नव्या टीम सहभागी होणार आहेत. त्यामुळे आयपीएल 2022 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.

चेन्नईकडं आहेत अनेक मॅचविनर

चेन्नई सुपर किंग्सकडं महेंद्रसिंह धोनीसह अनेक मॅचविनर आहेत. त्यांना सोडण्याची फ्रँचायझीची इच्छा नाही. पण, रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची नेमकी संख्या समजल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होणार आहे, असं सीएसकेच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला बोलताना सांगितलं आहे.

T20 World Cup: टीम इंडियाची आज समजणार ताकद, प्रत्येक खेळाडूवर असेल धोनीची नजर

कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी आयपीएल फायनल मॅच संपल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात (presentation ceremony) धोनीला रिटायरमेंटबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी  धोनीनं पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याबाबत सांगितलं की, 'बरच काही बीसीसीआयवर अवलंबून आहे. कारण, 2 नव्या टीम येणार आहेत. माझ्या फ्रँचायझीला नुकसान व्हावं असं मला वाटत नाही.

IPL 2021 मधील फ्लॉप खेळाडूचा T20 World Cup मध्ये रेकॉर्ड, मलिंगाला टाकलं मागं

मी सीएसकेकडून खेळणार की नाही हे फारसं महत्त्वाचं नाही. चेन्नईसाठी बेस्ट काय असेल ते महत्त्वाचं आहे. कोर ग्रुपनं 10 वर्ष टीमला सांभाळलं आहे. आता बेस्ट काय आहे, हे आम्हाला पाहायचं आहे.' असं धोनीनं सांगितलं. त्याचबरोबर मी अजून सोडलेलं नाही, असंही धोनी हसत-हसत शेवटी म्हणाला होता.

First published:
top videos

    Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni