• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 मधील फ्लॉप खेळाडूचा T20 World Cup मध्ये रेकॉर्ड, मलिंगाला टाकलं मागं

IPL 2021 मधील फ्लॉप खेळाडूचा T20 World Cup मध्ये रेकॉर्ड, मलिंगाला टाकलं मागं

आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup 2021) पहिल्याच दिवशी बांगलादेशला (Bangladesh) पराभवाचा धक्का बसला. स्कॉटलंडनं (Scotland) पात्रता फेरीतील मॅचमध्ये त्यांचा 6 रननं पराभव केला. या पराभवातही बांगलादेशच्या अनुभवी खेळाडूंनं टी20 क्रिकेटमध्ये रेकॉर्ड केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑगस्ट: आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup 2021) पहिल्याच दिवशी बांगलादेशला (Bangladesh) पराभवाचा धक्का बसला. स्कॉटलंडनं (Scotland) पात्रता फेरीतील पहिल्याच मॅचमध्ये त्यांचा 6 रननं पराभव केला. या पराभवातही बांगलादेशच्या अनुभवी खेळाडूंनं टी20 क्रिकेटमध्ये रेकॉर्ड केला आहे. बांगलादेशचा ऑल राऊंडर शाकीब अल हसननं (Shakib Al Hasan) आंतरराष्ट्रीय 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. शाकिबच्या नावावर आता 108 विकेट्स असून त्यानं श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) मागं टाकलं आहे. स्कॉटलंडच्या इनिंगमधील 11 व्या ओव्हरमध्ये रिची बॅरिंगटनला आऊट करत त्यानं प्रथम मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्यानंतक त्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर मायकल लिएस्कला लिंटन दासकरवी कॅच आऊट करत त्यानं मलिगांला मागे टाकलं. याचवर्षी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या मलिंगाच्या नावावर या प्रकारात 107 आंतरराष्ट्रीय  विकेट्स आहेत. IPL मध्ये ठरला फ्लॉप बांगलादेशकडून 2007 पासून प्रत्येक टी20 वर्ल्ड कप खेळणारा शाकीब हा या आयपीएलमध्ये (IPL 2021) फ्लॉप ठरला. तो कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) सदस्य होता. त्यानं 8 मॅचमध्ये फक्त 4 विकेट्स घेतल्या आणि अवघे 47 रन केले. शाकीब आयपीएल फायनलमध्ये (IPL 2021 Final) शून्यावर आऊट झाला होता. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या क्वालिफायर मॅचमध्येही त्याला भोपळा फोडता आला नव्हता. T20 World Cup : पहिल्याच सामन्यात Oman चा धमाका, PNG ला 10 विकेटने लोळवलं! बांगलादेशचा पराभव मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पराभूत करुन हवेत असणारं बांगलादेशचं विमान स्कॉटलंडनं जमिनीवर आणलं आहे.  स्कॉडलंडने बांगलादेशचा (Bangladesh vs Scotland) 6 रनने पराभव केला आहे. स्कॉडलंडने दिलेल्या 141 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 रनच करता आले. बांगलादेशकडून मुशफिकरु रहीमने (Mushfiqur Rahim) सर्वाधिक 38 रनची खेळी केली, तर कर्णधार महमदुल्लाह (Mahamadullah) 23 रन करून आऊट झाला. स्कॉडलंडकडून ब्रॅडली व्हीलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर क्रिस ग्रीव्हजला 2 विकेट घेण्यात यश आलं. जॉश डेव्ही आणि मार्क वॅट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
  Published by:News18 Desk
  First published: