दुबई, 18 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) तब्बल 5 वर्षांनी सुरुवात झाली आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरु आहेत. मुख्य स्पर्धेला 23 तारखेपासून सुरूवात होणार आहे. टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) असेल. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या या महामुकाबल्यापूर्वी टीम इंडियाला आपली ताकद जाणून घेण्याची संधी सोमवारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात दुबईमध्ये वॉर्म-अप मॅच होणार आहे. दुबईतील याच मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आयपीएल स्पर्धेमुळे (IPL 2021) भारतीय क्रिकेट टीममधील सर्व खेळाडूंना दुबईतील पिच आणि हवामानाचा अंदाज आहे. पण, पाकिस्तान विरुद्धच्या मॅचपूर्वी योग्य टीम कॉम्बिनेशनसाठी ही मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. विशेषत: दुबईतील ग्राऊंडवर खेळण्याचा मोठा अनुभव पाकिस्तानला असल्यानं भारतीय टीमला रविवारच्या मॅचमध्ये योग्य कॉम्बिनेशनसह उतरणे आवश्यक आहे. टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) टीम इंडियामध्ये दाखल झाला आहे. धोनीला टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्याच्याच कॅप्टनसीखाली चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) नुकतीच आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. धोनीच्या मार्गदर्शनाचा भारतीय क्रिकेटपटूंना या स्पर्धेत मोठा फायदा होणार आहे. T20 World Cup Live Streaming: IND vs ENG पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच? महेंद्रसिंह धोनी टीम इंडियात दाखल होताच कामाला लागला आहे. त्याचे फोटो बीसीसीआयनं सोशल मीडियावर शेअर केले असून त्यामध्ये तो मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड, बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे.
Extending a very warm welcome to the KING 👑@msdhoni is back with #TeamIndia and in a new role!💪 pic.twitter.com/Ew5PylMdRy
— BCCI (@BCCI) October 17, 2021
महेंद्रसिंह धोनीचं या मॅचमध्ये टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूवर बारीक लक्ष असेल. त्यानंतर धोनी, विराट आणि सपोर्ट स्टाफाच्या मंथनातून पाकिस्तान विरुद्धच्या मॅचसाठी प्लेईंग 11 तयार होणार आहे. भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

)







