जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: ब्रॅण्डन मॅकलम लवकरच देणार KKR च्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा!

IPL 2022: ब्रॅण्डन मॅकलम लवकरच देणार KKR च्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा!

IPL 2022: ब्रॅण्डन मॅकलम लवकरच देणार KKR च्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा!

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील ‘प्ले ऑफ’ साठी संघर्ष करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) टीमचा कोच लवकरच राजीनामा देणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील ‘प्ले ऑफ’ साठी संघर्ष करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) टीममधून एक मोठी बातमी आहे. या टीमचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलम (Brendon Mccullum) या स्पर्धेनंतर राजीनामा देणार आहे. केकेआरनं या सिझनमध्ये आत्तापर्यत 12 पैकी 5 सामने जिंकले असून 7 मध्ये पराभव सहन केला आहे. पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या या टीमला ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकून इतर निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे. मॅकलम यांच्या राजीनामा देण्यामागे केकेआरच्या या खराब कामगिरीचा काहीही संबंध नाही. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमचे मॅकलम कोच होणार असं वृत्त आहे.ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा 0-4 असा एकतर्फी पराभव झाला होता. या पराभवानंतर ख्रिस सिल्व्हरवूड यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा माजी कॅप्टन असलेल्या मॅकलमचं नाव इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. मॅकलमनं आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससह त्रिनिदाद आणि टोगो या कॅरेबीन प्रीमियर लीगमधील टीमचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे. एका राष्ट्रीय टीमचा कोच होण्याची त्याची पहिलीच वेळ आहे. IPL 2022 : पृथ्वी शॉबद्दल बोलताना पंत भावुक, राजस्थानवरील विजयानंतर म्हणाला… न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना एक आक्रमक खेळाडू आणि कॅप्टन म्हणून मॅकलमची ओळख होती. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये 2015 साली न्यूझीलंडनं क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. मॅकलमनं 2015-16 च्या सिझनमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध 54 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्याच सामन्यात वादळी शतक झळकावणाऱ्या मॅकलम कोच म्हणूनही आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये केकेआरनं मागील सिझनमध्ये उपविजेतेपद पटकावले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात