मुंबई, 12 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) या टप्प्यातील प्रत्येक सामने महत्त्वाचे आहेत. यापैकी कोणत्याही सामन्यातील चुकीमुळे त्यांच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. आयपीएलमधील या निर्णायक टप्प्यावर दिल्लीला त्यांचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची कमतरता भासत आहे. पृथ्वी सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (DC vs RR) 8 विकेट्सनं पराभव केला. राजस्थानवरील विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) पृथ्वी शॉला काय झालंय याचा खुलासा केला. 'आम्हाला त्याची मोठी कमतरता जाणवत आहे. पण, या गोष्टी नियंत्रणात नाहीत. त्याला टायफाईड की असंच काही तरी झालं आहे, असं डॉक्टरनं मला सांगितलं. तो लवकर परत येईल अशी आशा आहे. पण, तो कधी येणार हे माहिती नाही,' असं पंतनं यावेळी सांगितलं.
राजस्थान विरूद्धच्या मॅचमधील दिल्लीच्या कामगिरीवरही पंतनं समाधान व्यक्त केले. 'आम्ही आदर्श खेळाच्या जवळपास खेळलो. त्याचबरोबर यामध्ये नेहमीच सुधारणा होऊ शकते याचा मला विश्वास आहे.आम्ही आणखी चांगली फिल्डिंग करू शकतो. टॉस जिंकल्यानंतर 140 ते 160 पर्यंतचे टार्गेट चांगले असेल असं मी म्हंटलं होतं आणि आम्हाला 160 रनचं टार्गेट मिळालं. 100 टक्के योगदान दिलं तर नशीब देखील मदत करते.' असे पंतने स्पष्ट केले.
Kieron Pollard B'day : सीएसकेविरूद्ध मुंबई इंडियन्सचा विजय नक्की! वाचा काय आहे कारण
पृथ्वी शॉने या सिझनमधील 9 सामन्यांमध्ये 159.88 च्या स्ट्राईक रेटनं 259 रन केले आहेत. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या जोडीनं दिल्लीला दमदार सुरूवात करून दिली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीनं मनदीप सिंह आणि केएस भरत यांचा प्रयोग केला. पण, हे दोन्ही प्रयोग फसले. भरत राजस्थान विरूद्ध शून्यावरच आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.