मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : रोहित शर्माला मोठा धक्का, पहिल्या मॅचमधून Surykumar Yadav out!

IPL 2022 : रोहित शर्माला मोठा धक्का, पहिल्या मॅचमधून Surykumar Yadav out!

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) काळजी वाढवणारी बातमी आहे. टीमचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 जानेवारी : आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) काळजी वाढवणारी बातमी आहे. टीमचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) विरूद्ध 27 मार्च रोजी होणार आहे. सूर्याला भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील T20 सीरिजमध्ये दुखापत झाली होती.

सूर्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपचार सुरू आहेत. ही दुखापत मुंबईला भारी पडली आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवसह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना मुंबई इंडियन्सनं रिटेन केले होते.

बीसीसीआयच्या सूत्रांनी काही दिवसांपूर्वी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार 'सूर्या अद्याप एनसीएमध्ये आहे.  त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो बरा होत आहे, पण आयपीएलमधील पहिली मॅच खेळू शकेल याची खात्री नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याला पहिल्या मॅचमध्ये न खेळण्याचा सल्ला देऊ शकते.'

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू आहे. गेल्या काही सिझनमध्ये तीन नंबरवर त्यानं चांगली कामगिरी केली आहे. तो दुखापतग्रस्त होण्यापूर्वी जबरदस्त फॉर्मात होता. त्याची दुखापत हा मुंबई इंडियन्सला मोठा धक्का आहे. त्या परिस्थितीमध्ये कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनवर (Ishan Kishna) दबाव वाढणार आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी हैदराबादचा तरूण खेळाडू तिलक वर्माला (Tilak Varma) संधी मिळू शकते. त्याचबरोबर रमणदीप सिंह आणि अनमोलप्रीत सिंह हे खेळाडू देखील दावेदार आहेत.

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनंतर 'हा' खेळाडू होणार CSK चा कॅप्टन, रैनानं सांगितलं नाव

मुंबई इंडियन्सची टीम :  रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी

First published:

Tags: Cricket news, Mumbai Indians, Rohit sharma, Suryakumar yadav