Home /News /sport /

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनंतर 'हा' खेळाडू होणार CSK चा कॅप्टन, रैनानं सांगितलं नाव

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनंतर 'हा' खेळाडू होणार CSK चा कॅप्टन, रैनानं सांगितलं नाव

धोनी आता 40 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्यानंतर सीएकेचा कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. सीएसकेकडून 2008 पासून खेळणारा मिस्टर आयपीएल सुरेश रैनानं (Suresh Raina) या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 23 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होण्यासाठी आता मोजकेच दिवस उरले आहेत. 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) या मॅचनं स्पर्धेला सुरूवात होईल. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये चेन्नईनं मागील वर्षी आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. धोनी आता 40 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्यानंतर सीएकेचा कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. सीएसकेकडून 2008 पासून खेळणारा मिस्टर आयपीएल सुरेश रैनानं (Suresh Raina) या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. रैनानं आयपीएल 2022 चे ब्रॉडकास्टर 'स्टार स्पोर्ट्स'नं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'सीएसकेकडं रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) हे खेळाडू आहेत. हे सर्वजण महेंद्रसिंह धोनीचे उत्तराधिकारी होऊ शकतात. या सर्वांची खेळाची समज आणि क्षमता चांगली आहे. पण, माझ्या मते जडेजा या सर्वांमध्ये आघाडीवर आहे.' रैनाला या आयपीएल सिझनपूर्वी सीएसकेने रिलीज केले. त्यानंतर आयपीएल ऑक्शनमध्ये एकाही टीमनं त्याला खरेदी केलं नाही. जडेजाचं पारडं का जड? आयपीएल 2022 पूर्वी चेन्नईनं चार खेळाडूंना रिटेन केले. त्यामध्ये टीम इंडियाचा ऑल राऊंडर जडेजाचं नाव पहिल्या क्रमांकावर होते. जडेजाला चेन्नईनं 16 कोटींना तर धोनीला 12 कोटींमध्ये रिटेन केले. धोनीनं स्वत: जडेजासाठी पहिला क्रमांक सोडला होता. त्यानंतर जडेजाच सीएसकेचा भावी कॅप्टन असेल, असा अंदाज करण्यात येत आहे. अर्थात याबाबत सीएसकेच्या मॅनेजमेंटकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. Ashleigh Barty Retires : वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटूची 25 व्या वर्षीच अचानक निवृत्ती! रविंद्र जडेजा 2012 पासून सीएसकेच्या टीमचा सदस्य आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये 2 वेळा आयपीएल जिंकण्यात त्याचे योगदान होते. आयपीएल 2021 मध्ये जडेजा चांगलाच फॉर्मात होता. त्याने 16 मॅचमध्ये 227 रन केले तसंच 13 विकेट्स घेतल्या. तो बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये टीमसाठी योगदान देतो. तसंच सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही फॉर्मात आहे. त्यामुळेच धोनीनंतर सीएसकेचा कॅप्टन म्हणून जडेजाचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Ravindra jadeja

    पुढील बातम्या