Home /News /sport /

रोहित शर्माची डोकेदुखी वाढली! जडेजा, चहरसह 5 भारतीय खेळाडू जखमी

रोहित शर्माची डोकेदुखी वाढली! जडेजा, चहरसह 5 भारतीय खेळाडू जखमी

आयपीएल 2022 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंमध्येही भर पडली असून त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) डोकेदुखी वाढली आहे.

    मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंमध्येही भर पडली असून त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) डोकेदुखी वाढली आहे. टीम इंडियातील 5 खेळाडू सध्या जखमी आहेत. त्याचा फटका आगामी आंतरराष्ट्रीय मालिका तसंच टी20 वर्ल्ड कपच्या तयारीवर होणार आहे. टीम इंडियातील कोणते खेळाडू सध्या जखमी आहेत ते पाहूया दीपक चहर : चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) दीपक चहरला (Deepak Chahar) 14 कोटींमध्ये खरेदी केले होते. तो आयपीएल ऑक्शनमधील दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख खेळाडू आहे. दीपक दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल सिझन खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीचा मोठा फटका सीएसकेला बसला. त्याचबरोबर टीम इंडियाच्या अडचणीतही यामुळे भर पडणार आहे. सूर्यकुमार यादव : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) प्रमुख बॅटर सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हाताला दुखापत झाली आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स या मॅचमध्ये त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यंदा फॉर्मात असलेल्या सूर्यकुमाराला दुखापतीनं चांगलंच सतावलंय. तो आयपीएल सुरू होण्यापूर्वीही 3 आठवडे दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. रविंद्र जडेजा : टीम इंडियाचा प्रमुख ऑल राऊंडर असलेल्या रविंद्र जडेजासाठी (Ravindra Jadeja) हा आयपीएल सिझन खराब गेला. त्याला 8 सामन्यानंतरच सीएसकेची कॅप्टनसी सोडावी लाागली. त्यानंतर आरसीबी विरूद्धच्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना जडेजा जखमी झाला. त्यामुळे तो देखील आयपीएलमधून आऊट झाला आहे. जडेजाची दुखापत हा टीम इंडियाला मोठा धक्का आहे. IPL 2022 Points Table : मुंबईनंतर चेन्नई देखील स्पर्धेतून आऊट, वाचा अन्य टीमची काय आहे परिस्थिती वॉशिंग्टन सुंदर : टीम इंडियाच्या तरूण खेळाडूला दुखापतीनं ग्रासलं आहे. सनरायझर्स हैदराबादकडू खेळणाऱ्या सुंदरला या आयपीएल सिझनमध्ये दोनदा दुखापत झाली आहे. टी. नटराजन : आयपीएल 2022 मध्ये नटराजननं दमदार कामगिरी केली आहे. त्यानं आत्तापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. या सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. या कामगिरीमुळे त्याची टीम इंडियात पुनरागमन करण्याची शक्यता होती. पण, नटराजन पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे तो सनरायझर्सच्या शेवटच्या दोन मॅच खेळू शकला नव्हता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Team india

    पुढील बातम्या