जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 Points Table : मुंबईनंतर चेन्नई देखील स्पर्धेतून आऊट, वाचा अन्य टीमची काय आहे परिस्थिती

IPL 2022 Points Table : मुंबईनंतर चेन्नई देखील स्पर्धेतून आऊट, वाचा अन्य टीमची काय आहे परिस्थिती

IPL 2022 Points Table : मुंबईनंतर चेन्नई देखील स्पर्धेतून आऊट, वाचा अन्य टीमची काय आहे परिस्थिती

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीमचे या सिझनमधील आव्हान संपुष्टात आले आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मे : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीमचे या सिझनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. पॉईंट टेबलमध्ये नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या या दोन टीममधील लढतीत मुंबईनं सीएसकेचा 5 विकेट्सनं पराभव केला. या पराभवानंतर सीएसकेच्या उर्वरित सर्व आशा संपुष्टात आल्या. आता या दोन्ही टीम इतरांना धक्का देण्यासाठी खेळणार आहेत. मुंबईच्या बॉलर्सनी सीएसकेला 16 ओव्हरमध्ये 97 रनवर ऑल आऊट केलं. 98 रनचं आव्हान पार करण्यासाठी देखील मुंबईला चांगलंच झगडावं लागलं. बईची अवस्था 4 आऊट 33 अशी झाली होती, पण तिलक वर्माने 32 बॉलमध्ये नाबाद 34 रनची खेळी केली. याशिवाय ऋतीक शौकीन आणि रोहित शर्माने प्रत्येकी 18-18 आणि टीम डेव्हिडने 7 बॉलमध्ये नाबाद 16 रन केले. सीएसकेकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सिमरजीत सिंग आणि मोईन अली यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. मुंबई आणि सीएसकेचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता ‘प्ले ऑफ’ मधील 3 जागांसाठी 7 टीममध्ये चुरस आहे. हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (GT) ही ‘प्ले ऑफ’ मध्ये दाखल झालेली पहिली टीम आहे. गुजरातनंतर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) देखील प्ले ऑफच्या अगदी उंबरठ्यावर आहे. लखनऊचे 16 पॉईंट्स असून त्यांना आता उर्वरित 2 पैकी 1 सामना जिंकणे आवश्यक आहे.   राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांचे 12 सामन्यानंतर 14 पॉईंट्स आहेत. त्यांनाही ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची मोठी संधी आहे. IPL 2022 : पराभवानंतरही धोनीनं केली टीमची प्रशंसा, पुढील सिझनसाठी दिला इतरांना इशारा दिल्ली कॅपिटल्सचे (DC) 12 सामन्यानंतर 12 पॉईंट्स आहेत. दिल्लीचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने त्यांनी जिंकल्यास ही टीम प्ले ऑफमध्ये जाऊ शकते. सनरायझर्स हैदराबादला (SRH) टॉप 4 मध्ये जाण्यासाठी उर्वरित तीन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांनाही आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरित सामने चांगल्या रन रेटनं जिंकावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात