मुंबई, 10 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 सीरिजसाठी (India vs New Zealand T20 Series) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) या टीमचा कॅप्टन करण्यात आलं आहे. तर टी20 टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये आयपीएल स्पर्धा (IPL 2021) गाजवणाऱ्या तीन खेळाडूंना टीममध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
आरसीबीचा फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel), दिल्ली कॅपिटल्सचा फास्ट बॉलर आवेश खान (Avesh Khan) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या तिघांची टीम इंडियात पहिल्यांदाच निवड झाली आहे. यापैकी आवेश आणि व्यंकटेश हे दोघं मध्य प्रदेशचे खेळाडू असून सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेतही त्यांनी चांगली कामगिरी केली आगे. आवेशचा यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात नेट बॉलर म्हणून समावेश केला होता.पण, तेव्हा तो दुखापतीमुळे लवकर परतला होता. आता आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानं त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. तसंच तो प्लेईंग 11 मध्ये खेळण्याचीही शक्यता आहे.
आवेश या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळला. त्यानं 16 मॅचमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतही त्यानं चांगली कामगिरी केली आहे. त्यानं आत्तापर्यंत 5 मॅचमध्ये 12 च्या सरासरीनं 9 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2021 मध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हर्षल पटेलची न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. पटेलनं या आयपीएल सिझनमधील 15 मॅचमध्ये 32 विकेट्स घेतल्या. त्यानं एक वेळा 5 आणि 1 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हर्षलनं 5 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या असून न्यूझीलंडविरुद्धही या कामगिरीची तो पुनरावृत्ती करेल अशी आशा आहे.
T20 World Cup Semi Final: न्यूझीलंडकडं मोठी संधी, विल्यमसन घेणार 2 वर्षांपूर्वीचा बदला!
हार्दिक पांड्याचा वारसदार
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे. व्यंकटेश अय्यरने हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) जागा घेतली आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये व्यंकटेश अय्यरने केकेआरला (KKR) आयपीएल फायनलपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका निभावली. अय्यरने आयपीएल 2021 मध्ये केकेआरकडून खेळताना 10 मॅचमध्ये 370 रन केले आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याची ऑल राऊंड कामगिरी सुरू आहे. त्यानं 5 मॅचमध्ये 155 रन केले असून 5 विकेट्स मिळवल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, New zealand, Team india