मुंबई, 10 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) यांच्यात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेतील पहिली सेमी फायनल होणार आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंना या मॅचपूर्वी 2 वर्षांपूर्वी जखम ताजी झाली आहे. 2 वर्षंपूर्वीच्या त्या घटनेनं न्यूझीलंडला मोठा धक्का बसला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी न्यूझीलंडला या सेमी फायनलमध्ये मिळणार आहे.
दोन वर्षांपूर्वी 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध पराभव न होताही न्यूझीलंडला वर्ल्ड कप विजेतेपद मिळाले नव्हते. दोन्ही देशांमधील फायनल मॅच सुपर ओव्हरमध्येही टाय झाली होती. त्यानंतर इंग्लंडच्या टीमला बाऊंड्रीच्या आधारे विजेता घोषित करण्यात आले. आता सेमी फायनलमध्ये या जखमेवर मलम लावण्याची संधी केन विल्यमसनच्या (Kane Williamson) टीमकडं आहे.
इंग्लंडला दुखापतींचा फटका
इंग्लंड टीमला विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानलं जात आहे. ग्रुप 1 मध्ये टॉपवर असलेल्या या टीमला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. ओपनिंग बॅटर जेसन रॉय दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. जोस बटलर आणि जेसन रॉय ही स्पर्धेतील आक्रमक ओपनिंग जोडी होती. रॉय स्पर्धेतून बाहेर पडल्यानं जॉनी बेअरस्टो इंग्लंडच्या इनिंगची सुरुवात करू शकतो. पण, तो सध्या फारसा फॉर्मात नाही.
बॅटींगप्रमाणे बॉलिंगमध्येही इंग्लंडला धक्का बसला आहे. टायमल मिल्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यानं डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या जागी प्लेईंग 11 मध्ये खेळलेला मार्क वूड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महागडा ठरला होता. दुसरिकडं न्यूझीलंडच्या टीमनं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं आहे. न्यूझीलंडनं त्या पराभवानंतर सलग 4 मॅच जिंकल्या असून हाच फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
विराट कोहलीची होणार कॅप्टनपदावरून हकालपट्टी, वाचा काय आहे BCCI चा प्लॅन
इंग्लंडची टीम: इयन मॉर्गन (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोइन अली, डेव्हिड मलान, सॅम बिलिंग्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, जेम्स विन्से, ख्रिस वोक्स, मार्क वूड, टॉम कुरन, रिस टॉपली आणि डेव्हिड विली.
न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), टोड अॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साऊदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, New zealand, T20 world cup