मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: रोहित शर्माची एक चूक ठरली मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण

IPL 2021: रोहित शर्माची एक चूक ठरली मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (IPL 2021) शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं (PBKS) मुंबई इंडियन्सचा (MI) 9 विकेट्सनं पराभव केला. रोहित शर्माची एक चूक मुंबईच्या पराभवात निर्णायक ठरली.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (IPL 2021) शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं (PBKS) मुंबई इंडियन्सचा (MI) 9 विकेट्सनं पराभव केला. रोहित शर्माची एक चूक मुंबईच्या पराभवात निर्णायक ठरली.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (IPL 2021) शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं (PBKS) मुंबई इंडियन्सचा (MI) 9 विकेट्सनं पराभव केला. रोहित शर्माची एक चूक मुंबईच्या पराभवात निर्णायक ठरली.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 24 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (IPL 2021) शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं (PBKS) मुंबई इंडियन्सचा (MI) 9 विकेट्सनं पराभव केला. मुंबईचा या सिझनमधील एकूण तिसरा तर सलग दुसरा पराभव आहे. गतविजेत्या मुंबईनं पहिल्या 5 पैकी 3 सामने गमावले आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या पराभवात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं केलेली एक चूक निर्णायक ठरली आहे.

चेन्नईत झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) यानं टॉस जिंकून मुंबईला बॅटींगचं निमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्सनं चेन्नईच्या पिचवर यापूर्वी देखील पहिल्यांदा बॅटींग केलेली आहे. त्यांना या पिचचा उत्तम अंदाज होता. त्यामुळे  पहिल्यांदा बॅटींग करायला मिळणे ही मुंबईसाठी एक अनुकुल संधी होती.

मुंबईची ओपनिंग जोडी या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरली.  दुसऱ्याच ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉक (Quinton de Cock) आऊट झाला. त्याला दीपक हुडानं (Deepak Hooda) आऊट केलं. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या बॅटींग ऑर्डरमध्ये एक आश्चर्यकारक बदल पाहयला मिळाला. नेहमी तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या जागी इशान किशन (Ishan Kishan) बॅटींगसाठी आला.

सूर्यकुमार यादव हा गेल्या काही सिझनपासून मुंबई इंडियन्सकडून नियमितपणे तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. मुंबईच्या मागील दोन विजेतेपदामध्ये त्यानं तिसऱ्या क्रमांकावर केलेल्या बॅटींगचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार सध्या फॉर्मातही आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी 20 मालिकेत त्यानं जोरदार खेळ केला होता. त्याचबरोबर या आयपीएलमधील पहिल्या चार मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा तो मुंबईचा एकमेव बॅट्समन होता.

तर दुसरिकडं इशान किशनचा फॉर्म ही मुंबईसाठी काळजीचा विषय आहे. मागच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या इशानचा या सिझनमध्ये 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेट आहे. पंजाबविरुद्धही इशानचा हा झगडा सुरु होता. त्याला 17 बॉलमध्ये फक्त 6 रन करता आले. पहिल्या 6 ओव्हरमधील पॉवर प्लेचा फायदा घेण्यात इशान किशन अपयशी ठरला.

IPL 2021 : ...मग हार्दिक पांड्या टीममध्ये तरी का आहे?

'पॉवर प्ले'मधील इशान किशनच्या संथ खेळामुळे मुंबईचे किमान 20 रन कमी झाले. हे कमी झालेले  20 रन त्यांच्या पराभावत निर्णयाक ठरले. फॉर्मातील सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा रोहित शर्माचा निर्णय हा मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरला आहे.

First published:

Tags: IPL 2021, Ishan kishan, Mumbai Indians, Punjab kings, Rohit sharma, Suryakumar yadav