Home /News /sport /

IPL 2021 : ...मग हार्दिक पांड्या टीममध्ये तरी का आहे?

IPL 2021 : ...मग हार्दिक पांड्या टीममध्ये तरी का आहे?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या पाचही सामन्यांमध्ये मुंबईच्या बॅट्समनना 160 रनचा टप्पा ओलांडता आलेला नाही. मधल्या फळीतल्या खेळाडूंचं अपयश हे याचं मुख्य कारण आहे.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 23 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या पाचही सामन्यांमध्ये मुंबईच्या बॅट्समनना 160 रनचा टप्पा ओलांडता आलेला नाही. मधल्या फळीतल्या खेळाडूंचं अपयश हे याचं मुख्य कारण आहे. इशान किशन (Ishan Kishan), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, तसंच ओपनर क्विंटन डिकॉकही (Quinton De Kock) अपयशी ठरला आहे. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनीच अर्धशतकी खेळी केल्या आहेत. सूर्यकुमारने कोलकात्याविरुद्ध (KKR) आणि रोहितने पंजाबविरुद्ध (Punjab Kings) अर्धशतक केलं. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या सगळ्या विजयांमध्ये ऑलराऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याने मोलाची भूमिका बजावली, पण यंदा मात्र हार्दिक अपयशी ठरला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक बॉलिंग करू शकत नाही, तसंच तो 30 यार्डच्या आतमध्येच फिल्डिंगला उभा राहतो, कारण त्याला बाऊंड्री लाईनवरून थ्रो करण्यात अडचणी येत आहेत, असं मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी सांगितलं आहे. आयपीएलच्या या मोसमात हार्दिकने 13, 15, 7, 0 आणि 1 रन करून आऊट झाला. 5 सामन्यांमध्ये हार्दिकने फक्त 36 रन केल्या आहेत. हार्दिकला जर खांद्याची दुखापत असेल, तर तो मोठे शॉट तरी कसे मारू शकतो? मग तो टीममध्ये तरी का आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तीन परदेशी खेळाडूंसह मुंबई मैदानात पंजाब आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईची टीम फक्त तीन परदेशी खेळाडूंना घेऊन मैदानात उतरत आहे. चेन्नईची खेळपट्टी बघता मुंबईने जयंत यादवला या दोन सामन्यांमध्ये खेळवलं. पुढच्या सामन्यांसाठी हार्दिक पांड्या फिट नसेल तर मुंबईकडे जेम्स नीशमच्या रुपात ऑलराऊंडर आहे. न्यूझीलंडचा जेम्स नीशम हार्दिकप्रमाणेच फास्ट बॉलिंग आणि मधल्या फळीत आक्रमक बॅटिंग करू शकतो. चेन्नईच्या मैदानातली पंजाबविरुद्धची मुंबईची शेवटची मॅच होती, यानंतर रोहितची टीम आता दिल्लीमध्ये 4 सामने, बँगोलरमध्ये 3 आणि कोलकात्यामध्ये 2 मॅच खेळणार आहे. दिल्लीचं छोटं मैदान आणि बँगलोर कोलकात्याच्या बॅट्समनना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या मुंबईच्या बॅट्समनना मदत करू शकतात.
    First published:

    Tags: Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या