नवी दिल्ली 12 ऑक्टोबर: प्लेऑफमधील एलिमिनेटर सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीवर (RCB vs KKR) 4 विकेट्सनी विजय मिळवत आरसीबी संघाचा यंदाचा आयपीएला प्रवास थांबवला. आरसीबी पराभूत झाल्याने विराटचं (virat kohli after RCB vs KKR Match) विजयी कर्णधार होण्याचे स्वप्नही तुटले. दरम्यान RCB संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विराट खुप दुःखी पाहून चाहते नाराज झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराटसह इतर खेळाडूही निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओद्वारे विराटने संघातील खेळाडूंना विशेष संदेशही दिला. यादरम्यान तो खूप भावनिक दिसला. बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता. त्याला इतके निराश पाहता चाहतेदेखील नाराज झाले आहेत. हृदयात खुप त्रास असल्याचे एका चाहत्याने म्हटले आहे. त्याच्या कमेट्सचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-
RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला केले ट्रोल विराट म्हणाला, आयपीएलचा 2016 मधील हंगाम आमच्यासाठी खास होता. त्या हंगामाचा आम्ही आनंदही लुटला. केकेआरकडून पराभव झाल्यामुळे आम्हा निराश झालो असलो तरी तुटलेलो नाही. संघाचा खुप अभिमान आहे असे सांगत विरटने सर्वांचे आभार मानले.
#RCBvKKR Dressing Room Emotions
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 12, 2021
A sudden end to a fine season campaign, Virat Kohli’s last match as full time captain of RCB, the team spirit that brought us until here, - raw emotions in the dressing room at the end of our #IPL2021 journey.https://t.co/UstexXNKIA#PlayBold
2013 च्या हंगामात कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली जेव्हा डॅनियल व्हिटोरी या पदावरून पायउतार झाला. विराटच्या कारकिर्दीत RCB ने 2016 मध्ये अंतिम फेरीसह चार वेळा प्लेऑफ गाठली आहे. हे वाचा- ‘…तर तुम्हाला सर्वांना ब्लॉक केले जाईल’, RCB च्या पराभावानंतर भडकला मॅक्सवेल सर्वाधिक 140 सामने फ्रँचायझीचे नेतृत्वकरूनही जेतेपदाची पाटी कोरी राहणारा विराट हा एकमेव कर्णधार ठरला आहे. विराटने 140 सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी 66 सामने जिंकले, तर 70 मध्ये पराभव पत्करला. 139 डावांमध्ये त्यानं 5 शतके व 35 अर्धशतकांसह 41.99च्या सरासरीने 4871 धावा केल्या.