Home /News /sport /

RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला केले ट्रोल

RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला केले ट्रोल

RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला केले ट्रोल

RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला केले ट्रोल

विराट कोहलीचे आयपीएल २०२१ (IPL2021चे स्वप्न धुळीस मिळवले. ९ वर्ष RCBचे नेतृत्व सांभाळूनही विराटची जेतेपदाची पाटी कोरीच राहिल्यामुळे त्याचे चाहते भडकले अन् गोलंदाज डॅन ख्रिस्टियन ( Dan Christian ) याच्यासह त्याची गर्भवती पत्नीलाही ट्रोल करण्यात आले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 12 ऑक्टोबर :  सध्या सर्वत्र आयपीएलची (IPL) धूम सुरू आहे. सोमवारी (11 ऑक्टोबर) या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची मॅच झाली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही शेवटची(virat kohli end of RCB captaincy)  आयपीएल असून यंदा ते स्पर्धा जिंकतील अशी आशा होती. मात्र केकेआरने (KKRvsRCB)त्यांना पराभूत करुन स्पर्धेबाहेर केले. आरसीबी पराभूत झाल्याने विराटचं विजयी कर्णधार होण्याचे स्वप्नही तुटले.  पण या पराभवाचा सामना केवळ खेळाडूंनाच नाही तर त्यांच्या कुटूंबालाही करावा लागला आहे. अष्टपैलू डॅनियल ख्रिश्चनच्या अपयशी खेळीमुळे त्याच्या गर्भवती पत्नीला ट्रोल केले असल्याचे समोर आले आहे. आरसीबीच्या प्रत्येक प्लेयरने या मॅचमध्ये जीव तोडून खेळ केला, पण अष्टपैलू डॅनियल ख्रिश्चनच्या (Daniel Christian) सुमार बॉलिंगमुळे त्यांची सगळी मेहनत वाया गेली. शारजाहमध्ये झालेल्या या मॅचमध्ये डॅनियल ख्रिश्चनला बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये सूर सापडला नाही. त्यानं आठ बॉल्सवर फक्त नऊ रन्स केल्या आणि तो आउट झाला तर बॉलिंग करताना एका ओव्हरमध्ये त्यानं 22 रन्स दिल्या. त्याच्या या ओव्हरमध्ये सुनील नरेनने (Sunil Narine) तीन षटकार ठोकले आणि तिथेच ही मॅच फिरली. सुनील नरेनने 1.4-0-29-0 अशा रन्स केल्या. या ओव्हरमध्ये ख्रिश्चनचा इकोनॉमी रेट 17.39 होता. अखेर केकेआरने चार विकेट्स राखून आरसीबीचा पराभव केला आणि विराट कोहली आणि आरसीबीच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. यामुळे नेटिझन्सनी डॅनियल ख्रिश्चनला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली. त्यालाच नव्हे तर त्याच्या पार्टनरलाही (Partner) नेटिझन्सनी ट्रोल केलं. ट्रोलर्सली  वैतागलेल्या ख्रिश्चनने अखेर सोशल मीडियावर एक मेसेज टाकून ट्रोल्स थांबवावेत अशी विनंती केली. 'आज माझा खेळ चांगला झाला नाही, हे मान्य आहे, परंतु हा खेळ आहे. कृपया माझ्या पार्टनरला यात ओढू नका,' अशी विनंती त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील मेसेजद्वारे केली आहे. याआधी, कोहलीच्या नेतृत्वाखालील चॅलेंजर्ससाठी ख्रिश्चनसोबत खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनेही (Glen Maxwell) ट्रोल्स थांबवण्याचे आवाहन केलं. नेटिझन्सनी माणूस म्हणून थोडी तरी सहानुभूती, शालीनता दाखवावी अशी अपेक्षा त्यानं व्यक्त केली. सर्व चढ-उतारांमध्ये संघाबरोबर राहणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या खऱ्या चाहत्यांचे त्यानं आभार मानले. 'सोशल मीडियावर फॉलो होणाऱ्या काही गोष्टी अगदी घृणास्पद आहेत. आम्हीही माणसंच आहोत, प्रत्येक वेळी आम्ही आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशाप्रकारे बदनामी करण्यापेक्षा माणुसकी दाखवा,' असं मॅक्सवेलने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. एलिमिनेटरमध्ये मॅक्सवेलचीही कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यानं 15 पेक्षा कमी रन्स केल्या तर त्याने टाकलेल्या तीन ओव्हर्समध्ये तो एकही विकेट घेऊ शकला नाही. मॅक्सवेल आणि ख्रिश्चन दोघेही संयुक्त अरब अमिरातीमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2021च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहेत.
    First published:

    Tags: RCB, Virat kohli

    पुढील बातम्या