नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही शेवटची (virat kohli end of RCB captaincy) आयपीएल असून यंदा ते स्पर्धा जिंकतील अशी आशा होती. मात्र केकेआरने (KKRvsRCB) त्यांना पराभूत करुन स्पर्धेबाहेर केले. आरसीबी पराभूत झाल्याने विराटचं विजयी कर्णधार होण्याचे स्वप्नही तुटले. पराभवानंतर काही नेटकऱ्यांनी विराट आणि त्याच्या संघाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, सामन्यानंतर मॅक्सवेलने (Glenn Maxwell) ट्वीट करत नेटकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. सामन्याच्या काही तासांनंतर, मॅक्सवेलने त्यांच्या समर्थनाबद्दल चाहत्यांचे आभार मानले, परंतु अपमानास्पद ट्रोल्सना ट्रोल केले. काय म्हणाला मॅक्सवेल? आरसीबीसाठी हा हंगाम चांगला ठरला. आम्हाला जिथे पोहोचायचे होते तिथे पोहोचता आले नाही. पण याचा अर्थ असा नाही की ही आयपीएल आमच्यासाठी चांगली नव्हती. पण तरीही सोशल मीडियावर नेटकरी चुकीचे बोलत आहेत. त्या लोकांना समजले पाहिजे की, आम्ही मानव आहोत जे दररोज आपले सर्वोत्तम देत आहेत. गैरवर्तन पसरवण्याऐवजी, एक सभ्य व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. असे म्हणस मॅक्सवेलने नेटकऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) October 11, 2021
तसेच, मॅक्सवेलने त्यांच्या समर्थनाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. असे काही लोक आहेत ज्यांना सोशल मीडिया भितीदायक वातावरण बनवायचे आहे. मात्र, ते सहन केले जाऊ शकत नाही. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी असे वागू नये.
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) October 11, 2021
जर तुम्ही माझ्या टीममधील कोणत्याही मित्र/मैत्रिणीवर सोशल मीडियावर नकारात्मक/अपमानास्पद मूर्खपणासह टिप्पणी केली, तर तुम्हाला सर्वांनी ब्लॉक केले जाईल. वाईट व्यक्ती असण्याचा काय अर्थ होतो? कोणतेही निमित्त नाही. असेही मॅक्सवेल आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मॅक्सवेल आयपीएल 2021मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 15 सामन्यांमध्ये 42.75च्या सरासरीने 513 धावा केल्या. त्याने संपूर्ण स्पर्धेत संघासाठी 16 षटके टाकली आणि 135 धावा देऊन 3 बळी घेतले.