मुंबई, 13 मे: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटींगचा मुख्य आधारस्तंभ आहे. मुंबईकडून तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला येतो. मॅचच्या परिस्थितीप्रमाणे खेळ करण्यात त्याचा हातखंडा आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) सूर्यकुमारनं 145.01 च्या स्ट्राईक रेटनं 480 रन काढले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली होती. पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत चांगली कामगिरी करत सूर्यकुमारनं सर्वांना प्रभावित केलं. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यानं त्याचा बॅटिंगचा सिक्रेट मंत्र सांगितला आहे. “मी सलग दोन बॉलवर दोन रन काढण्यासाठी पळाल्यानंतर थकतो. त्यावेळी मी खराब शॉट खेळण्याची शक्यता असते. या परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मी बॅटच्या हँडलवर WTB असं लिहलं आहे. मला अनेक जण याचा अर्थ काय आहे? हे विचारतात. त्यांना मी लहान मुलासारखा वागतोय, असं वाटतं. ओके, मला कुणालाही खूश करायचं नाही. ही लहान मुलांसारखी वाटणारी गोष्ट माझ्यासाठी उपयोगाची आहे. मी माझ्या सर्व बॅटवर हँडलच्या जवळ WTB म्हणजेच Watch The Ball असं लिहलं आहे. त्यामुळे मी बॅटींगसाठी तयार होत असताना ते मला दिसते. त्यामुळे मी आधीपासून योजना आखत नाही, बॉल पाहून खेळतो. हा मंत्र मला मागच्या वर्षापासून उपयोगी ठरत आहे. टीम इंडियाकडून खेळतानाही याचा उपयोग झाला. " या शब्दात सूर्यानं त्याचं सिक्रेट शेअर केलं आहे.
Surya's secret mantra to keep it simple in the middle - WTB 🤔
— Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2021
🎥 @surya_14kumar makes a few revelations in this latest episode of Candid Calls 😋#OneFamily #MumbaiIndians #MI #KhelTakaTak @MXTakaTak MI TV pic.twitter.com/uCqSmjHWzT
WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जडेजा करतोय जय्यत तयारी, पाहा VIDEO सूर्यकुमार यादवनं इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत 3 मॅचमध्ये 185.41 च्या स्ट्राईक रेटनं 89 रन केले. ही आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी त्यानं 7 मॅचमध्ये 144.16 च्या स्ट्रााईक रेटनं 173 रन केले आहेत.

)







