मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जडेजा करतोय जय्यत तयारी, पाहा VIDEO

WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जडेजा करतोय जय्यत तयारी, पाहा VIDEO

आयपीएल स्पर्धा  स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना  ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) या ब्रेकमध्ये वेळ वाया न घालवता इंग्लंड दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

  • Published by:  News18 Desk

राजकोट, 13 मे : टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट खेळणार आहे. आयपीएल स्पर्धा  स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना  ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) या ब्रेकमध्ये वेळ वाया न घालवता इंग्लंड दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

रविंद्र जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत त्यानं पुनरागमन केलं. या स्पर्धेत तो जबरदस्त फॉर्मात होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध खेळताना जडेजानं चार फोर आणि पाच सिक्सच्या मदतीनं 62 रनची आक्रमक खेळी केली होती. त्या मॅचमध्ये त्यानं वॉशिंग्टन सूंदर, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांच्या विकेट्स घेतल्या. तसंच एकाला रन आऊट देखील केलं.

जडेजा सध्या जामनगरमधील त्याच्या फार्म हाऊसमध्ये आहे. या फार्महाऊसमधील जिममध्ये तो चांगलाच घाम गाळत आहे. या तयारीचा एक व्हिडीओ त्यानं नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये दोन आठवडे क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. यामध्ये मुंबईतील खेळाडूंना एक आठवड्याची सूट देण्यात आली आहे, मात्र या कालावधीमध्ये त्यांना घराच्या बाहेर जाता येणार नाही. हे सर्व खेळाडू 18 किंवा 19 मे रोजी मुंबईत एकत्र येतील. त्यामुळे त्यांचा दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी वेळेत पूर्ण होईल.

IPL 2021: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! बेन स्टोक्सने घेतला 'हा' निर्णय

या दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना कोरोना लशीचा पहिला डोस भारतामध्ये तर दुसरा डोस ब्रिटनमध्ये देण्यात येईल. एखादा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता येणार नाही, हे बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Instagram post, Ravindra jadeja, Video